वॉशिंग्टन : आपल्या एकूण कारकीर्दीत सहावेळा आंतराळात जाण्याचा आणि चंद्रावर चालण्याचा विक्रम केलेले नासाचे वैज्ञानिक जॉन यंग यांचे निधन झाले आहे. नासानेच हे वृत्त दिले आहे.
आंतरिक्ष एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार ८७ वर्षीय जॉन यंग हे निमोनियाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांचावर उपचार सुरू असतानाच त्यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. यंग हे नासा स्पेस सेंटरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ह्यूस्टन परिसरात राहात होते. एजन्सीचे प्रशासक रॉपर्ट लिघटफुट यांनी एका प्रतिक्रियेत सांगितले की, 'नासा आणि जगाने एक अग्रणी व्यक्ती गमावला.'
प्राप्त माहितीनुसार, यंग यांनी आंतराळातील अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी ६ वेळा आंतराळ प्रवास केला होता. तसेच, आंतराळात सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रमही जॉन यंग यांच्या नावार आहे.