कन्नूर : केरळच्या कन्नूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वासराची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर काँग्रेसनं या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी या घटनेचा निषेध केला आहे. केरळमध्ये जे काही झालं त्याचा मी विचारही करू शकत नाही. अशा गोष्टींचा काँग्रेसमध्ये कधीही स्वीकार केला जाऊ शकणार नाही, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.
वासराच्या कत्तल करण्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला काँग्रेसनं असं काही घडलंच नसल्याचं छातीठोकपणे सांगत होते. हा व्हिडिओच बनावट असल्याचं सिद्ध करण्याच्या खटपटीत काँग्रेस नेते होते. केरळ पोलिसांनी गोहत्येच्या प्रकरणामध्ये युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आणि आतापर्यंत काँग्रेसच्या बचावाचे मार्ग बंद झाले.
गायीची कत्तल करणाऱ्या व्यक्तीचे दस्तुरखुद्द काँग्रेस युवराज राहुल गांधींसोबत असलेले फोटो व्हायरल झाले आणि अखेर काँग्रेसला आपला सूर बदलावा लागला.हा सगळा घृणास्पद प्रकार घडला तो बिफ फेस्टिवलमुळे... केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध लोकशाही मार्गानं करणं समजण्यासारखं आहे... मात्र निषेधासाठी एका मुक्या जनावराच्या गळ्यावरून सुरी फिरवण्यापर्यंत मजल गेलीये... सेक्युलॅरिझम आणि प्रत्येक धर्माचा आदर करावा आशी बोंब मारणाऱ्या काँग्रेसचेच हे कार्यकर्ते आहेत... केवळ निषेध करून किंवा या कार्यकर्त्यांना पक्षातून काढल्यानं भागणार आहे का?