कर्नाटक : कर्नाटकच्या आमदाराने शुक्रवारी चहा विकून १० मिनिटांत ५ हजार रुपये कमावले. इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जेडी (एस) चे बंडखोर आमदार जमीर अहमद मैसूर चहावाल्याच्या भूमिकेत दिसले. ज्या दुकानदारीच चहा विकली त्याला त्यांनी ते सर्व पैसे दिले. याचसोबत स्वत:कडचेही १० हजार रुपये दिले. रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आ. जमीर हे आपले सहकारी वासु यांच्यासोबत एका चहाच्या टपरीवर गेले आणि चहा विकू लागले. आमदाराला चहा विकताना पाहून तिथे गर्दी जमू लागली. अधिकारी, पार्टी कार्यकर्ते आणि सर्वसाधारण जनताही चहा घेण्यासाठी गर्दी करू लागली.
तसतर चहाच्या एका कपची किंमत जास्तीत जास्त दहा रुपये असते. पण याच चहासाठी कोणी १०० रुपये दिले तर कोणी २०० रुपये दिले.
बघता बघता १० मिनिटात त्यांच्याजवळ ५ हजार रुपये गोळा झाले. हे पैसे आमदाराने चहावाल्याला दिले.
चहा विकून १० मिनिटात ५ हजार मिळतील असा विचार चहा टपरी मालकाने स्वप्नातही विचार केला नसेल. पैशांसोबत त्याच्या दुकानाची मोफत प्रसिद्धीही झाली.