भावनगर : कांद्याच्या किंमतींचे दर गगनाला भिडले आहेत. देशभरामध्ये कांदा ८० रुपये ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे मध्यमवर्ग आणि गरिबांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. पण भावनगरच्या महुवामध्ये कीबल कांदा १४ रुपये किलोने उपलब्ध आहे. डिहायट्रेड करण्यात आलेला हा कांदा फक्त ३ मिनिटांमध्ये खाण्या योग्य होतो.
गुजरातच्या भावनगरमध्ये देशातले ७५ टक्के डिहायड्रेशन प्लांट बांधण्यात आले आहेत. या प्लांटमध्ये कांद्यावर प्रक्रिया करुन त्याला सुकवलं जातं. महुवाचे व्यापारी ५ ते १० रुपये किलोने हजारो टन कांदे विकत घेतात. यानंतर या कांद्यांवर डिहायड्रेशनची प्रक्रिया करुन त्यांना सुकवलं जातं.
७ किलो कांद्याला सुकवताना १ किलो सुका कांदा शिल्लक राहतो. या कांद्याला कीबल म्हणलं जातं. याचा वापर परदेशात आणि भारतात मसाले करताना आणि इतर प्रॉडक्ट तयार करताना होतो. या सुक्या कांद्याला ३ मिनिट गरम पाण्यात ठेवल्यानंतर हा कांदा वापरण्यायोग्य होतो.