"मित्र सोबत असताना नवऱ्याला फोन करायचा नाही"; लग्नात वधूने केली अनोख्या 'मॅरेज कॉन्ट्रॅक्ट'वर सही

50 रुपयांच्या स्टॅम्पवर केलेल्या करारामध्ये वधूसाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या आहेत

Updated: Nov 11, 2022, 04:30 PM IST
"मित्र सोबत असताना नवऱ्याला फोन करायचा नाही"; लग्नात वधूने केली अनोख्या 'मॅरेज कॉन्ट्रॅक्ट'वर सही title=
(फोटो सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

लग्नानंतर मुलं आणि मुलींवर अनेक प्रकारची बंधने येतात. लग्नानंतर आणखी जबाबदारी वाढते आणि मुलांना किंवा मुलींना घराबाहेर पडता येत नाही अशी तक्रार सातत्याने केली जाते. मित्रांकडूनही त्यांच्यावर याच मुद्दावरुन टीका केली जाते. नवविवाहित जोडपे (newly-wedded couples) त्यांच्या नातेसंबंधाचा शोध घेण्यासाठी एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. म्हणूनच केरळच्या (Kerala) एका नवऱ्याच्या जवळच्या मित्रांनी या समस्येवर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. वराच्या मित्रांनी एक करार करत वधूची त्याच्यावर स्वाक्षरी घेतली आहे. 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करार सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर मॅरेज कॉन्ट्रॅक्टचे ( marriage contract) पत्र व्हायरल होत आहे. 50 रुपयांच्या स्टॅम्पवर केलेल्या करारामध्ये वधूसाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या आहेत. हा लग्नाचा करार मुलाच्या मित्रांनी आणला होता, ज्यावर लग्नाआधी वधूची सही घेतली होती.

लग्नानंतरही त्याने पूर्वीप्रमाणेच भेटत राहावे, अशी मुलाच्या मित्रांची इच्छा होती. रात्री उशिरा मोकळेपणाने फिरता यावं, यासाठी वराच्या मित्रांनी वधूसाठी 50 रुपयांच्या स्टॅम्पवर मॅरेज कॉन्ट्रॅक्ट केले होते आणि लग्नाच्या दिवशी त्यावर स्वाक्षरी करून घेतली.

या 'मॅरेज कॉन्ट्रॅक्ट'वर मल्याळममध्ये वधू अर्चना एस लग्नानंतरही ही रघू एस केडीआरला रात्री 9 वाजेपर्यंत मित्रांसोबत वेळ घालवू देईल आणि त्या दरम्यान वारंवार फोन कॉल करणार नाही, असे लिहीले आहे. वधूसह दोन साक्षीदारांनीही या 'करारावर' सह्या केल्या आहेत.

एशियानेट न्यूजच्या व्हायरल फोमध्ये वधू अर्चना एस यांनी स्वाक्षरी केलेले कॉन्ट्रॅक्ट दाखवले आहे. मल्याळममध्ये (Malayalam) लिहिलेल्या पत्रात, "लग्नानंतरही माझे पती रघु एस केडीआर यांना रात्री 9 वाजेपर्यंत त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याची परवानगी असेल आणि मी याद्वारे वचन देते की त्या काळात मी त्याला फोनवर त्रास देणार नाही." 5 नोव्हेंबर रोजीच्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टवर दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, याआधीही असाच एक लग्नाचा करार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यावर सही करण्यात आली होती. नववधूने, महिन्यातून एकच पिझ्झा घेणे, रोज जिमला जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे, नेहमी घरी बनवलेल्या जेवणाला चांगले म्हणणे, अशा अटी ठेवल्या होत्या.