मुंबई : Knowledge News: जेव्हाही आपण आपल्या घरात वातानुकूलित (AC) बसवतो, तेव्हा ते भिंतीच्या वरच्या भागात बसवले जाते. तुम्ही भिंतीवर वरच्या भागात एसी लावलेले पाहिले असेल. एसी भिंतीच्या वरच्या भागात का लावतात हे जाणून घेऊ.
उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आपण आपल्या घरांमध्ये एअर कंडिशनर बसवतो. तुम्ही दुकानातून एसी घेता, तुमच्या घरात इलेक्ट्रीशियनकडून एसी बसवून घेता. भिंतीच्या वरच्या भागात एसी बसवण्यामागे शास्त्रीय कारण आहे.
एसीची हवा जेव्हा वरच्या भागात जाते तेव्हा ती संपूर्ण खोल्याच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकते. सोबतच गरम हवा लवकर ओढून घेतल्याने खोलीला थंड करते.
भिंतीच्या वरच्या भागात एसी लावल्याने हवा जमीनीपर्यंतही सहज पोहजते. तसेच रुम हीटर जमीनीवर लावले जाते. जेणेकरून गरम हवेतील हलके रेणू सहज वर पोहचतात.
संवहन प्रक्रियेमुळे खोली बराच वेळ थंड राहू शकते. जेव्हाही खोलीत एसी चालू असेल तेव्हा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे. भिंतीच्या खालच्या भागात एसी लावल्यास वरच्या भागात उष्णता राहते. यामुळे, एसी भिंतीच्या वरच्या भागावरच बसवला जातो.