Kuno National Park: नामिबियातून शनिवारी 8 चित्ते (Project Cheetah) भारतात दाखल झाले. भारतात ही प्रजाती नष्ट झाली असून तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्ते आणले गेले आहे. बोईंगच्या एका विशेष विमानाने शुक्रवारी रात्री आफ्रिकी देशातून उड्डाण केलं. लाकडापासून बनवलेल्या पिंजऱ्यात चित्त्यांना घेऊन जवळपास 10 तासांचा प्रवास करून विमान शनिवारी भारतात दाखल झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला नामिबियातून (Namibia) मध्यप्रदेशातल्या (Madhya Pradesh) कूनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) आठ चिते आणण्यात आले. या आठ चित्यांना नाव सूचवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अनेकांनी नावं सुचवली आहेत. यात मिल्खा, चेतक, वायू, स्वस्ति, त्वारा सारख्या नावांचा पर्याय देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रेडिओवर प्रसारित होणाऱ्या आपल्या 'मन की बात' (Man Ki Baat) या कार्यक्रमात नागरिकांना सरकारच्या MyGov.in वेबसाइटवर या चित्त्यांच्या (Cheetah) नावांच्या निवडीशी संबंधित स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
चित्याचं नाव सूचवा आणि बक्षिस मिळवा
पंतप्रधान मोदी यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्यांना नाव सूचवण्याचं आवाहन केलं असून विजेत्यांना कूनो राष्ट्रीय उद्यानात चिता बघण्यासाठी जंगल सफारीची संधी मिळणार आहे. तुम्हालाही या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर या स्पर्धेची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर आहे. पीएम मोदींनी रेडिओ कार्यक्रम मन की बातमध्ये चित्त्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान जनतेसाठी खुलं केलं जाऊ शकतं का याबाबत सरकार निर्णय घेईल.
लोकांनी सुचवली नावं
चित्यांना नावं सूचवण्याच्या यादीत आतापर्यंत लोकांनी अनेक नावं सुचवीलआहेत. यात वीर, पनाकी, भैरव, ब्रह्मा, रुद्र, दुर्गा, गौरी, भाद्र, शक्ति, चिन्मयी, चतुर, रक्षा, मेधा आणि मयूर सारख्या नावांचा पर्याय दिला आहे. आतापर्यंत 750 नावं सूचवण्यात आली आहेत.