जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांची बाजी

 दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी बाजी मारत वर्चस्व कायम ठेवलं आहे. विद्यार्थी संघाच्या चारही पदांवर डाव्या संघटनांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Updated: Sep 10, 2017, 12:43 PM IST
जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांची बाजी title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी बाजी मारत वर्चस्व कायम ठेवलं आहे. विद्यार्थी संघाच्या चारही पदांवर डाव्या संघटनांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

शनिवारी रात्री उशिरा या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बाप्साने डाव्या संघटनांना कडवं आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडन्ट्स असोसिएशन, स्टुडन्टस फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक स्टुडन्टस फेडरेशन या डाव्या विचारांच्या संघटनांनी एकत्र येत युनायटेड लेफ्ट पॅनेल अंतर्गत निवडणूक लढवली होती.

जेएनयूमध्ये दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या कथित देशविरोधी घोषणांमुळे अभाविप आणि डाव्या संघटनांमधील संघर्ष तीव्र झाला. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांकडून सत्ता काबीज करण्यासाठी अभाविप आणि बाप्पासाने कंबर कसली होती.