Leopard Attack Video : गेल्या काही महिन्यांत बिबट्याने सर्वसामान्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात एका 6 वर्षाच्या चिमुरड्याचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना ताजी असताना अजून एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्राजवळील एका गावात एका 8 वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ आग्राचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. (leopard Attack injures 8 year old boy agra video viral trending news )
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक बिबट्या भिंतीवर चालताना दिसून येतो आहे. काही वेळानंतर मैदानात एका बिबट्या एका लहान मुलाला जबड्यात धरलं दिसत आहे. हा व्हिडीओ स्पष्ट दिसत नाही आहे. पण बिबट्या मुलाना जमिनीवर झोपवतानाही दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नशिबाने त्या चिमुकल्याचा जीव वाचला असल्या तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, बिबट्याने मुलाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर तसंच शरीराच्या अनेक भागांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
हा चिमुकला घटना उत्तर प्रदेश-राजस्थान सीमेवर असलेल्या सैयान या गावातील असल्याचं बोललं जातं आहे. त्याच गावातील रहिवासी भूरी सिंगचा मुलगा डेविड असं त्या चिमुकल्याच नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आगरा मे बच्चे पर किया तेंदुआ ने हमला बच्चे की हालत गम्भीर डर के साये में रह रहे ग्रामीण
दो बार कर दिया ग्रामीणों पर हमला वन विभाग को भी दी गयी सूचना यूपी-राजस्थान बार्डर पर HPपेट्रोल पंप पर घूमता तेंदुआ सैयां थाना के तेहरा में किया मासूम पर हमला@agrapolice @Uppolice @UpforestUp pic.twitter.com/8WX0c2aImq— ज़राफत खान पत्रकार (ज़ियारत न्यूज़) (@MdZarafat) November 17, 2023
हल्ल्यानंतर मूल वेदनांमुळे जोरजोरात ओरडू लागला त्यामुळे लोकांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. बिबट्याच्या भीतीमुळे पोलिसांनी स्थानिकांना दोन दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत.