गृहपाठ करायला विसरली म्हणून शिक्षिकेने मुलीसोबत केलं असं कृत्य...! तुमच्याही अंगावर येईल काटा

शिक्षक आपल्या जीवावर उठतो तेव्हा शिक्षक जातीवरील विश्वास उडून जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Jul 13, 2022, 03:17 PM IST
गृहपाठ करायला विसरली म्हणून शिक्षिकेने मुलीसोबत केलं असं कृत्य...! तुमच्याही अंगावर येईल काटा title=

Viral Video : गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
आज गुरुपौर्णिमा आहे. शालेय जिवनात शिक्षक आपला गुरु असतो. आजच्या दिवशी आपण त्यांना वंदन करतो. शिक्षक हा आपला सगळ्या खास मित्र. आपल्या अनेक प्रश्नांचं तो आपल्याला अचूक उत्तर देतो. मात्र शिक्षक आपल्या जीवावर उठतो तेव्हा शिक्षक जातीवरील विश्वास उडून जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

काय केलं या शिक्षिकेने?

या व्हिडीओमुळे शिक्षकेच्या नावावर काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. 30 सेकंदचा हा व्हिडीओ पाहिल्यावर एक शिक्षिका असं कसं करु शकते, असा प्रश्न पडतो. या शिक्षिकेला मुलंबाळं नाही का, असा संतापजनक प्रश्न निर्माण होतो.

जर एखादा विद्यार्थी होमवर्क करुन आला नाही तर त्याला काय शिक्षा होईल? जास्तीत जास्त क्लासच्या बाहेर उभं राहावं लागेल. पण या शिक्षिकेने जे केलं ते पाहून तळ मस्तकाची आग डोक्यात जाते. 30 सेकंदच्या या व्हिडीओमध्ये या शिक्षिकेने मुलीला 10 वेळा कानशिलात मारली.

शिक्षिकेने केली हद्दपार

तन्नू नावाच्या विद्यार्थीनीने होमवर्क केला नाही म्हणून या शिक्षिकेचा पारा चढला. रागाच्या भरात या शिक्षिकेने हद्दच पार केली. या लहानशा तन्नूला शिक्षिकेने जोरदार मारलं. येवढचं नाही तर तिचे केस ओढून ओढून तिला तुफान बदडलं.

सोशल मीडियामुळे कारवाई

तन्नू घरी गेल्यावर आई- वडिलांनी तिच्या चेहऱ्यावरील डागाविषयी विचारल्यावर तिने घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी थेट शाळा गाठली आणि हेड मास्टरांना जाच विचारला. हेड मास्टरांनी परत असा प्रकार घडणार नाही असं आश्वासन देऊन प्रकरण तिथेच थांबवलं. मात्र या शिक्षिकेचा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिच्यावर कारवाई करण्यात आली.

ही घटना उन्नावमधील असोहा ब्लॉकच्या इस्लामनगर प्राथमिक शाळेतील आहे. CDO दिव्यांशु पटेल यांनी शिक्षक अधिकाऱ्याला या प्रकरणाची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. तसंच या शिक्षिकेविरोधात SC/ST कायद्यार्तंग मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर घटनेकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी हेड मास्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत.