'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'

Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदींना हाकलायचे आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलीय. 

Pravin Dabholkar | Updated: May 12, 2024, 05:57 PM IST
'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार' title=
Narendra Modi Lier Says Kharge

Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदींना हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले. लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे जाहीर सभा झाली. यावेळी खर्गे बोलत होते. या जाहीर सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,विधिमंडळ नेते, बाळासाहेब थोरात ,आमदार कुणाल पाटील, आमदार चंद्रकांत हांडोरे, माजी आमदार अनिल गोटे, शिवसेना ठाकरे गटाचे अशोक धात्रक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी जीएसटी, औषध, शेतीपूरक वस्तूंच्या किंमती वाढवल्या. मोदी है तो मुनकीन है, म्हणतं टॅक्स वाढवला. बोलतात खूप आणि काँग्रेसने काय केले अस प्रश्न विचारतात. काँग्रेसने काही केले नसते तर मोदी पंतप्रधान झाले नसते, असे ते म्हणाले. 

मोदी हे डोंगर पोखरुन उंदीर काढतात. अश्या लोकांनी देश चलात नाहीत. त्यासाठी नेहरू, गांधींसारखे लोक पाहिजे. 800 लोकांना ईडीच्या केस टाकून आत टाकले आहेत. महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे. मला मराठी येते पण चुका होऊ नये म्हणून मराठीत बोलत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

देशाला सशक्त करू शकत नाही, मजबूत करू शकत नाही मग मोदींना मतं कश्याला देता? असा प्रश्न त्यांनी विचारला.मोदी उठले की हिंदू मुसलमान करतात, विभागणी कारण्याचे कामं करीत आहेत. देशाबद्दल बोला. जे केले ते सांगा, विभाजना बद्दल काय बोलतात? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मुंबई ते अमदाबाद बुलेट ट्रेन आणणार होते.  कुठे आहे बुलेट ट्रेन? लोकांना किती मूर्ख करताय. सर्वकालीन मूर्ख करता येत नाही. भाजप 400 नाही 40 पर करणार नाहीत. काँग्रेसने लोकशाही मजबूत केली.  भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला बहुमत गरजेचे आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळतील असा आमचा रिपोर्ट असल्याचे खर्गे म्हणाले.

रोड शो देशाची भलाई करणार नाही, आरक्षण कायम ठेवायचे असेल तर संविधान रक्षण केलेच पाहिजे. अग्निवीर योजना दिशाभूल करणारी आहे. प्रधानमंत्री काही करू शकत नाहीत. म्हणून त्यांना सत्तेबाहेर ठेवा. निवडून आलेल्या सरकारला दाबण्यासाठी भाजपडे तीन चाव्या आहेत. ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्सचा धाक दाखवला जातोय, असे ते म्हणाले. 

विचार नसलेले लोक देशा साठी आणि राज्यासाठी काही कामं करू शकत नाहीत. महाराष्ट्र ने कधी मागे बघितले नाही. हे पुढे जाणारे राज्य आहे. कापूस आणि कांद्याचे जितके उत्पादन होते. त्याकडे पाहणारे कोणी नाही. आम्ही शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ. त्यांच्या साठी झगडू असे खर्गे यावेळी म्हणाले.