स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral

Mahakumbh 2025 Blue Eyes Girl: महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीचे 'निळे डोळे आणि डस्की स्किन'चे सौंदर्य इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. यावरून ही तिची स्तुती आणि की तिचा हा छळ आहे असा प्रश्न उपस्थित होतो. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 17, 2025, 04:10 PM IST
स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral  title=
Photo Credit: Instagram

Mahakumbh 2025 Blue Eyes Dusky Skin Garland Seller Girl Goes Viral: 144 वर्षांनंतर प्रयागराज शहरात महाकुंभ मेळा 2025 होत आहे. भव्य कार्यक्रम विविध विधी, परंपरा, आणि चालीरीतीसह हा कुंभमेळा सुरु आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात आपला माल विकण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. वेगेवगेळ्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही मोठी संधी आहे. या मेळ्यातील अनेक व्हिडीओ, फोटो रोज सोशल मीडियावर येत आहेत. अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची १६ वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. या रीलवरही यूजर्स खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

स्तुती की छळ? 

काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा  असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ चुकीच्या कारणास्तव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलीचे सौंदर्य टिपण्यासाठी इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. ती निघत जात आहे तरी तेव्हा फोन आणि कॅमेरे घेऊन उभे असलेले तरुण तिच्या मागे जात आहेत. यामुळे नेटकरी ही तिची स्तुती आहे की हा तिचा छळ आहे? असा प्रश्न करत आहेत. 

हे ही वाचा: Photo: 22 बायका, 100 मुलं... जगाला सर्वात श्रीमंत देश देणारा राजा कोण होता?

 

बघा व्हिडीओ 

 

मोनालिसाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती तिचे नाव आणि पत्ता सांगण्यासोबतच तिला विचारलेल्या लग्नाच्या प्रश्नांची उत्तरेही देताना दिसत आहे. या कथेमध्ये तुम्हाला माळा  विकणाऱ्या मुलीची संपूर्ण माहिती मिळेल.

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

 

तुझे डोळे खूप सुंदर आहेत...

शिवम लखारा या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस माळा विकणाऱ्या मुलीशी बोलताना दिसत आहे. तो तिला म्हणती की,  तुमच्या सुंदर डोळ्यांमुळेच लोक तुमचे फोटो काढतात. ज्याच्या उत्तरात ती म्हणते की ती आता व्हायरल झाली आहे. हातात माळा घेऊन जत्रा परिसरात व्यवसाय करणाऱ्या या मुलीसोबत फोटो काढण्यासाठी लोक मागे उभे असलेलेही दिसतात.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

लग्नाबद्दल तुमचे काय विचार आहेत?

शिवम लखाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये तो मुलीला प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रथम तो तिच्याशी मोनालिसाला तिच्या माळा   विक्रीच्या व्यवसायाबद्दल विचारतो. मग पुढे तो तिला विचारतो की लग्न? तर ती म्हणते की मी लहान आहे, फक्त 16 वर्षांची आहे. ज्यानंतर तो विचारतो की तिला कोणाला आवडले आहे का, इतके युटूबर्स तुला फॉलो करत आहेत त्यापैकी?

 

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

 

या प्रश्नाच्या उत्तरात मुलगी म्हणते, "नाही, कोणी नाही. प्रत्येकजण माझ्या भावासारखा आहे. आमच्यामध्ये जेवढ्या माळा विकणाऱ्या मुली आहेत ना त्या आपल्या पालकांच्या इच्छेनुसारच लग्न करतात." ही ७४ सेकंदाची क्लिप या संभाषणाने संपते.