Auto Expo 2025 : Maruti Suzuki नं कारप्रेमींसह भारतीय रस्ते आणि पर्यावरणीय हित लक्षात घेत पहिलीवहिली ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच या कारविषयी कारप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता असतानाच कंपनीनं केलेल्या दाव्यामुळं या अपेक्षांमध्ये आणखीनच भर पडली. कारण ही कार अनेकांच्याच Family car च्या संकल्पनेत योग्य बसताना दिसत आहे.
मारुतीकडून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार फुल चार्जमध्ये ही कार 500 किमी इतका टप्पा ओलांडू शकते. टोयोटाशी हातमिळवणी करत Heartect-E platform च्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या कारमध्ये विविध क्षमतेच्या बॅटरीचे मॉड्युल कंपनीकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.
कंपनीनं जारी केलेल्या टीझरनुसार कारला ट्राय स्लॅश एलईडी डेटाईम रनिंग लाईट डिझाईन देण्यात आले असून, काहीसं मोठं बोनेट आणि मारुती सुझूकीचा दर्शनीय स्थळी असणारा लोगो हे कारच्या बाहेरील लूकमधील काही विशेष. 18 इंचांचे अलॉय व्हील्स, सी पिलर माऊंटेड डोअर हँडल आणि कारच्या टेललाईटही अनोख्या पद्धतीनं डिझाईन केल्या आहेत.
कारच्या बॅटरी आणि परफॉर्मन्सविषयी सांगावं तर ती 49 kWh आणि a 61 kWh या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जिथं ग्राहकांना टू व्हील आणि फोर व्हील ड्राईव्ह असे कॉन्फीग्युरेशन निवडता येणार आहेत. या बॅटरीचं साधारण वजन 600 ते 700 किलो असेल असं सांगितलं जात आहे.
कारमध्ये अद्ययावत इन्फोटन्मेंट सिस्टीम, प्रवाशांच्या सोयीची आसनव्यवस्था, योग्य लेगस्पेस अशा गोष्टींसह पॅनोरॅमिक सनरुफ, स्वयंचलित क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि ड्यावर असिस्टंसही उपलब्ध आहे.
कारच्या किमतीविषयी म्हणावं तर, मारुती सुझूकी कंपनीकडून ही कार साधारण 20 ते 25 लाख रुपये इतक्या किमतीला विकली जाऊ शकते. तेव्हा येत्या काळात ईव्ही खरेदी करायच्या विचारात असाल तर, मारुतीची ही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्य़ाय ठरू शकते हे नक्की.