Meta India Head Ajit Mohan Resigns : मेटाचे इंडिया हेड (Meat India Head) अजित मोहन (Ajit Mohan Resign) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं मेटाने जाहीर केलंय. अजीत मोहन हे सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म असलेल्या स्नॅपसोबत नवी भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजीत मोहन जानेवारी 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून फेसबूकसोबत जोडले गेले होते. (meta formerly facebook india managing director ajit mohan step down his post)
अजीत मोहन यांनी पदावर असताना भारतात व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामने भारतात 200 दहालक्ष यूझर्स जोडले होते. अजीत मोहन यांनी मेटामध्ये येण्याआधी 4 वर्ष हॉटस्टारच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
"अजित यांना मेटाबाहेर चांगली संधी मिळाल्याने आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित मोहन यांनी गेल्या 4 वर्षात भारतात व्यापार वाढवण्यात निर्णायक आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना लाखो भारतीय व्यवसाय, भागीदार आणि लोकांची सेवा करता येईल. अजित यांनी कंपनीला दिले्लया योगदानाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल कृतज्ञ आहोत. अजित मोहन यांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो" असं मेटा ग्लोबल बिजनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी नमूद केलं.