नवी दिल्ली : #METOO च्या वादामध्ये केंद्र सरकारमधील एका राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता. असे असताना आणखी एक मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलेय. त्यामुळे ते #METOO च्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 'मीटू' ही चळवळ विकृत मानसिकतेमधून आली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी केले आहे.
दरम्यान, एम.जे. अकबर यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता त्यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. पुरुषांनीही असे आरोप करायला सुरूवात केली, तर चालेल का, असा अजब सवालही राधाकृष्णन यांनी केलाय.
It's a result of activities of some people with perverted minds. This corrupts purity of our land. This issue corrupts honour of women. If men will say the same thing about women what will happen? Is it acceptable? This is wrong: Union Minister Pon Radhakrishnan #MeToo (17.10) pic.twitter.com/A1YM93ZwVh
— ANI (@ANI) October 18, 2018
#METOO मोहीम ही काही विकृत मनाच्या लोकांनी सुरु केलेय. या मोहिमेमुळे आपल्या संस्कृतीवर घाला घातला जात आहे. यामुळे आपल्या महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचत आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय राधाकृष्णन यांनी केले आहे.
#METOO मोहीम चुकीची आहे. जर अशा स्वरुपाचे आरोप पुरुषांनी महिलांवर केले तर काय होईल? हे स्विकारार्ह राहिल का? जर एखाद्याने लैंगिक शोषणाने आरोप केले असतील तर ते योग्य असेल का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.