MP Crime : लग्न करुन आपल्या जोडीदारासोबत सुखासमाधानात आयुष्य व्यतीत करावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. अनेकदा लग्नाआधी आपल्या जोडीदाराबद्दलची माहिती मुलींना नसते. यामुळे त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. तरुणीचे लग्न झाले आणि मधुचंद्राच्या रात्री जे काही घडलं ते तिच्यासाठी फार धक्कादायक होतं. यानंतर तिच्या आयुष्यातील अडचणी वाढतच गेल्या. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मध्य प्रदेशातील एटा कोतवाली नगरमध्ये एक संतापजनक घटना घडली. नवविवाहित तरुणीने आपला नवरा नपुंसक असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. नपुसंक तरुणाशी लग्न करून आपली फसवणूक केल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिला ही मध्य प्रदेशातील रहिवाशी आहे. तिचे लग्न झाले आणि लग्नाची पहिली रात्रच तिच्यासाठी रक्तदाब वाढवणारी ठरली. कारण आयुष्यभरासाठी चांगल्या आठवणी साठवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीला त्याच रात्री पतीचे रहस्य समजले. आपला नवरा हा नपुसंक असल्याचे तिच्या लक्षात आले. आता काय करावे? हे तिला सुचत नव्हते. आपली घोर फसवणूक झाल्याचे तसेच आयुष्य उध्वस्त झाल्याची भावना तिच्या मनात येऊ लागली. नवरा किंवा सासरच्या मंडळींनी आपल्याला याबद्दल माहिती दिली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. त्यामुळे महिलेने सासरच्या मंडळींवरही आक्षेपार्ह वर्तन केल्याचे तिने आपल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेने पती, सासू आणि मध्यस्थासह नऊ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार या दाम्पत्याचे लग्न लावून देण्यात आले होते. मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे म्हणून तिच्या वडिलांनी सुमारे 25 लाख रुपये खर्च केले. मुलीसह माहेरची मंडळीदेखील लग्नाबद्दल आनंदी होती. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. लग्नानंतर ती मधुचंद्राच्या रात्री पतीच्या खोलीत गेली. तिने पतीकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण तो पलीकडे तोंड करून झोपला होता. तिने पतीसोबत बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण यानंतर जे घडले ते धक्कादायक होते. यानंतर पती नपुंसक असल्याचे गुपित उघड झाले. यानंतर मुलीने तिच्या आई-वडिलांना संपूर्ण गोष्ट सांगितली. तसेच सासरच्यांच्या कानावरदेखील ही गोष्ट घातली. यानंतर सासरच्यांनी मुलाला नपुसंकतेवर उपचार करुन घेण्याबाबत सांगितले. यानंतर पीडित तरुणीच्या पतीने जबलपूरच्या डॉक्टरांकडून उपचार घेतले पण फायदा झाला नाही.
काही दिवस असेच गेले. पती नपुसंक असल्याने पत्नी अस्वस्थ होती. अशाच तिला आणखी एक धक्का बसला. ती बेडरुममध्ये एकटी असताना पतीचे वडील म्हणजे सासरे तिच्या खोलीत आले. त्यांनी तिचा विनयभंग सुरू केल्याचा आरोप तिने केला आहे. याबाबत मी सासरच्या मंडळींकडे तक्रार केली पण मला मारहाण करण्यात आल्याचे ती सांगते. मला माझ्या पालकांशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आणि मला डॉक्टरांकडे नेऊन झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचे पीडितीने पोलिसांना सांगितले. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मला पुन्हा मारहाण करण्यात आल्याचे तिने सांगितले
माझा मुलगा काही कामाचा नाही असे सासरच्यांनी सांगितले. पैसे मिळवण्यासाठी आम्ही लग्न केले. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, असे सासरच्यांनी धमकावल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले. 26 ऑक्टोबर 2023 रोजी पतीने मला बसस्थानकावर सोडल्याचेही ती पुढे म्हणाली. दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे कोतवालीचे प्रभारी निर्देश सिंह सेंगर यांनी सांगितले. दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.