दारू होणार एकदम स्वस्त! घरातही सुरू करता येईल बार; सरकार देणार परवाना

आता राज्यातील प्रत्येक विमानतळावर विदेश मद्याच्या दुकानासाठी वेगळे काउंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात विकल्या जाणाऱ्या मद्याची किंमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 19, 2022, 04:13 PM IST
दारू होणार एकदम स्वस्त! घरातही सुरू करता येईल बार; सरकार देणार परवाना title=

भोपाल : मध्यप्रदेशात येत्या आर्थिक वर्षात राज्य मंत्री परिषदेने नवीन एक्साइज पॉलिसी 2022-23 आणि हेरिटेज वाइन पॉलिसी 2022 ला मंजूरी दिली आहे. या नवीन धोरणामुळे विदेशी मद्यावरील कर कमी होऊन राज्यात मद्याची किंमत स्वस्त होणार आहे. 

घरात बार उघडण्याची सूट

या धोरणाअंतर्गत एक कोटीहून अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना घरातच बार सुरू करण्याची सूट देण्यात आली आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन मद्य धोरणाला मंजूरी देण्यात आली आहे. या धोरणामुळे अवैध मद्य निर्मिती, परिवहन, साठा आणि विक्रीवर नियंत्रण आणता येईल असा दावा सरकारने केला आहे.

अवैध विक्रीला आळा

नवीन धोरणानुसार अवैध पद्धतीने विकल्या जाणाऱ्या मद्यावरील कर कमी करून नियमीत व्यवहारात आणले जाईल. त्यामुळे मद्याच्या किंमती कमी होतील असा सरकारचा दावा आहे. यासोबत सरकारने महुआ फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या मद्यालाही प्रायोगिक तत्वावर मंजूरी दिली आहे. 

विमानतळांवर मिळणार विदेशी मद्य

राज्यातील सर्व मोठ्या विमानतळांवर मद्य विक्रीचे स्टॉल असेल. त्यासाठी निश्चित परवाना शुल्कावर वाइन विक्री करण्याची परवानगी स्टॉलधारकांना देण्यात येईल.