नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषी पवनच्या गावी लालगंज क्षेत्रातील जगन्नाथपुर गावात त्याच्या फाशीची बातमी पोहोचताच शुकशुकाट पसरला. पवनचे नातेवाईक अतिशय शांत झाले. गावकरी यालाच विधीचं विधान म्हणून हे स्विकारत आहे. गावाचे प्रमुख संजय कुमार सांगतात की,'निर्भया प्रकरणामुळे आमच्या गावाला कलंक लागला.'
तरी देखील गावातील एका व्यक्तीला फाशी देण्यात आल्यामुळे ती दुःखी होते. गावाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा संपूर्ण गाव शांत झालं होतं. कारण पवनला अगदी लहानपणापासून ही गावकरी मंडळी ओळखत होती. गावातील पुजारी दयानंद गोवास्मी म्हणाले की,'विधीचं विधान कुणीच बदलू शकत नाही. त्याला फाशी देण्यात येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं.' ( चारही क्रूरकर्म्यांना फाशी, अखेर निर्भयाला न्याय)
Delhi: People, including women rights activist Yogita Bhayana celebrate & distribute sweets outside Tihar jail where four 2012 Delhi gang-rape case convicts were hanged at 5:30 am today. https://t.co/UzgNQgeGoV pic.twitter.com/ffS56YpFt9
— ANI (@ANI) March 20, 2020
चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. अखेर पवनला सकाळी साडे पाचवाजता फाशी देण्यात आली.
२०१२ मध्ये घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडिता 'निर्भया' ला तब्बल आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. क्रूरकर्म केलेल्या चारही दोषींना सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात आली. निर्भयासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्या प्रकारासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आली. (नराधमांना फासावर लटकावल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया)