Dare to dream Awards: डेअर टू ड्रीम अवॉर्ड्स 2022; नामांकने झाली खुली

यंदाचं थीम आहे (Next Big Leap) 'पुढील मोठी झेप', सहभागी व्हा या अनोख्या उत्सवात

Updated: Oct 26, 2022, 04:49 PM IST
Dare to dream Awards: डेअर टू ड्रीम अवॉर्ड्स 2022; नामांकने झाली खुली title=

Dare To Dream : प्रत्येक सुपरहिरो मुखवटा चढवत नाही आणि किंवा कोणताही स्पेशल सूट चढवत नाही. हेच सिद्ध करण्यासाठी पुन्हा येतायत 'डेअर टू ड्रीम अवॉर्ड्स 2022'. सॅप इंडिया असोसिएअशन आणि झी बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या यंदाच्या अवॉर्ड्सचं हे चौथं वर्ष. यामध्ये होणार आपल्या मातीतील SME इकोसिस्टीमधील उद्योजकांचा सन्मान.

कोरोनाच्या महामारीने सर्वांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. यामध्ये मुख्यतः व्यवसाय आणि ते चालवणारे व्यावसायिक होरपळून निघाले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वांवर बंधने तर आलीच, पण याचा व्यवसायांच्या उत्पन्नावर देखील मोठा परिणाम झाला. अर्थातच याचा थेट परिणाम नागरिकांवर आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर देखील झाला.

अशातही अनेकांनी या आव्हानाशी चार हात करत कठीण परिस्थितीत टिकून राहण्याचं सामर्थ्य दाखवलं. यंदाच्या डेअर टू ड्रीम पुरस्कारांमध्ये अशाच काही व्यावसायिकांचा आणि त्यांच्या यशोगाथेचा सन्मान केला जाणार आहे. या सर्व व्यावसायिकांनी कठीण परिस्थितीला तोंड देऊन मोठी भरारी घेत स्वतःला सिद्ध केलं आणि इतरांनाही मार्ग दाखवला. हे पुरस्कार अशा लीडर्सकडून प्रदान केले जाणार आहेत ज्यांनी केवळ 'काहीही शक्य आहे' या शब्दांवर विश्वास न ठेवता तशी कृती करून स्वतःला सिद्ध केलं आहे.

कोण आहेत Dare To Dream Awards 2022 या पुरस्कारांचे ज्युरी मेंबर्स?

डेअर टू ड्रीम पुरस्कारांचे सच्चे मानकरी कोण, हे ठरवण्यासाठी विविध क्षेत्रातून आलेल्या नामांकनांचा अतिशय बारकाव्याने अभ्यास केला जाईल. यासाठी विविध क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींना ज्युरी मेम्बर्स म्हणून नेमण्यात आलेलं आहे. यांच्याकडून पुरस्कारांचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत.

"लीडरशिप ही एक कृती असून हे केवळ एक पद नाही" हे मानणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्युरी मेंबर्समध्ये व्यवसाय क्षेत्रात तंत्रज्ञान, इन्होवेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बिझनेस लीडर्सचा समावेश असणार आहे.

ज्युरी मेंबर्समध्ये BSE SME & Startups चे हेड अजय ठाकूर, Acuité Ratings & Research Ltd च्या Executive Director & Chief Analytical Officer सुमन चौधरी आणि Managing Editor, ZEE Business चे अनिल सिंघवी यांचा समावेश आहे. यांनाच आमचे प्रमाणीकरण आणि प्रोसेस पार्टनर्स म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे.

या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना सुमन चौधरी म्हणाल्या, "भारतातील व्यवसाय जगभरात पसरतायत, जागतिक स्तरावर अत्याधुनिक संशोधन आणि विकास (R&D) प्रकल्पांसाठी भारताला प्रथम प्राधान्य म्हणून पाहिलं जातं. डेअर टू ड्रीम उपक्रमामुळे केवळ भारतातील SME आणि MSME क्षेत्र नव्हे तर एकूणच भारताच्या विकासाला चालना देणारा असणार आहे. मी यासाख्या उपक्रमाचा हिस्सा असल्याचा मला अभिमान आहे ज्याचं थीम 'पुढील मोठी भरारी' हे थीम आहे."

याबाबत बोलताना अनिल सिंघवी म्हणतात, "ज्या MSME च्या मदतीने भारत इंडियाशी जोडला गेलाय ती भारतातील प्रकाशझोतात न आलेल्या खऱ्या हिरोंची न ऐकलेली यशोगाथा आहे. ज्यांच्या मदतीने लाखो लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात, ज्यांच्या मदतीने उद्योजकता वाढीस लागली अशा अतुलनीय

व्यक्तिमत्त्वांचा इथे सन्मान केला जाणार आहे. यामाध्यमातून पडद्यामाडगील खऱ्या हिरोंचा सन्मान करणे हा आहे.

याबाबत अजय ठाकूर यांनीही आपलं मत नोंदवलं आहे. यामध्ये केवळ आपापल्या क्षेत्रातील दिगजांचा सन्मान होणार नाही. तर नव्या भारताचा पाया रचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार केला जाणार आहे. आमच्या निवड प्रक्रियेद्वारे भारतातील सर्वोत्कृष्ट पायोनियर्सचा सन्मान करणे, हे आमचं उद्दिष्ट आहे.

सध्याचा काळ भारतातील स्टार्ट-अप्ससाच्या वाढीसाठी आणि चमकण्यासाठी सर्वत्कृष्ट काळ आहे. आम्ही आशा करतो यामध्ये पात्र सदस्यांनी आपली नावं आणि नामांकने भरली असतील.

सर्वांसमोर झळकण्याची तुमची वेळ आली

जर तुमच्याकडे जगासोबत शेअर करण्यासाठी काहीतरी भन्नाट, प्रेरणादायी असेल किंवा तुमच्या मनात अशी एखादी व्यक्ती असेल ज्याला ते करायला आवडेल, तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे!

उद्योजगतेचा सन्मान करण्यासाठी तुम्ही स्वतःला, किंवा तुम्ही ओळखत असलेल्या कुणालाही, किंवा एखाद्या संस्थेला नामांकन देऊ शकतात. SAP.com

जर तुम्ही बिझनेस लीडर असाल तर तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या संस्थेला नॉमिनेट करण्याची ही संधी अजिबात सोडू नका. यासाठी तूम्हाला डेअर टू ड्रीम अवॉर्ड्सच्या संकेतस्थळावर 29 ऑक्टोबर 2022 आधी भेट द्यावी लागेल. ही संधी आहे उद्योग जगतातील इतर बड्या लिडर्सना भेटण्याची, त्यांच्यासोबत विचारांची देवाण घेवाण करण्याची. सर्व माहिती जाणून घेण्यासाठी 'येथे क्लिक करा'! Dare to dream nomination 

Nominations for Dare To Dream Awards 2022 Are Open! Be Part of Celebrations For The Next Big Leap!