विना हेल्मेट ट्रक चालवणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड

 परिवहन विभागाने दुर्लक्ष करूनही ट्रक चालकाला चलानचे पैसे जमा करावे लागले.

Updated: Mar 18, 2021, 11:45 AM IST
विना हेल्मेट ट्रक चालवणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड title=

ओडिशा : ओडिशामध्ये हेल्मेट न घालता ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीचे 1 हजार रुपयांचे चलन कापण्यात आले. ओडिशामध्ये परिवहन विभागाच्या दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. ओडिशाच्या गांजाम जिल्ह्यात हा प्रकार घडला. ड्रायव्हर प्रमोद कुमार हे ट्रकच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओला पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. परिवहन विभागाने दुर्लक्ष करूनही ट्रक चालकाला चलानचे पैसे जमा करावे लागले.

प्रमोद कुमार नावाच्या ट्रक चालकाला चलान कापले गेल्याची अजिबात माहिती नव्हती. जेव्हा ते ट्रक परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी परिवहन विभाग कार्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांच्या ट्रकचे चलन प्रलंबित असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, OR-07W/4593 या गाडीचे चलान जमा झाले नाही. 

यानंतर प्रमोद यांनी हे चालान का कापले गेले ? असे विचारले असता हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे 1000 रुपयांचे चलन वजा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रमोद कुमार हे बाईक नव्हे तर ट्रक चालवतात. त्यामुळे ही सर्व घटना अचंबित करणारी होती.

LPG सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, करा फक्त एवढंच !

अधिकाऱ्यांच्या उलट्या बोंबा

आपण ट्रक चालक आहोत मग हे चलान का कापले ? अशी विचारणा प्रमोद यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.त्यावेळी हेल्मेट न घालता वाहन चालविण्याचे चालान ट्रकमधून कापले गेले आहे असे उत्तर त्यांना मिळाले. अधिकाऱ्यांनी काही ऐकून घेतले नाही. चलान जमा केल्यावरच परमिटचे नूतनीकरण होईल असे अधिकारी म्हणाले. 

गेल्या तीन वर्षांपासून मी ट्रक चालवत असून ट्रकद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम करतो. ट्रकचा परमिटचे नूतनीकरण करणे आवश्यक होते म्हणून मी तिथे गेलो असता हा प्रकार समजला असे प्रमोद सांगतात. परंतु परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि सक्तीने 1000 रुपयांचे चलान प्रमोद यांना भरावे लागले.