नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर न केल्यानं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.
गुजरातमधील निवडणुकीच्या तारखा बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदीच जाहीर करतील, अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाला शालजोडीतले फटकारे लगावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी गुजरात दौ-यावर आहेत. राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणांची बरसात ते करतील, अशी अपेक्षा आहे.
बहुधा त्यानंतरच निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल, असा टोलाही पी. चिदंबरम यांनी लगावला.