नवी दिल्ली : पेट्रोल -डिझेलचे दर दिवसागणिक वाढतच आहेत. आज सलग आकराव्या दिवशी पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इंधनांच्या सलग वाढत्या किंमतींमुळे प्रवास देखील महागडा होत आहे. दिल्लीत आज पेट्रोलच्या दराने 90 रूपयांचा आकडा ओलांडला आहे. तर डिझेलच्या दरात देखील वाढ होत आहे. गुरूवारी डिझेल 580 रूपये प्रति लिटर होता. मात्र आज दिल्लीत डिझेलसाठी 80.60 रूपये मोजावे लागत आहे. दिल्लीत डिझेलचे भाव गेल्या वर्षी जुलै महिन्यात वाढले होते.
4 मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर
शहर कल का रेट आज का रेट
दिल्ली 89.88 90.19
मुंबई 96.32 96.62
कोलकाता 91.11 91.41
चेन्नई 91.98 92.25
4 मेट्रो शहरांमध्ये डिझेलचे दर
शहर कल का रेट आज का रेट
दिल्ली 80.27 80.60
मुंबई 87.32 87.67
कोलकाता 83.86 84.19
चेन्नई 85.31 85.63
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.