पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज इंडियन मोबाईल काँग्रेसची (IMC 2022) 5G सेवेची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानात अनेक प्रदर्शनांची सेवा नागरिकांसाठी केली. ज्याचा डेमोही पीएम मोदींनी घेतला होता. यावेळी त्यांनी 'Jio Glass'द्वारे 5G चा अनुभवसुद्धा घेतला. Jio Glass हा Jio कंपनीचा पहिला स्मार्ट ग्लास आहे, ज्याचा उद्देश 3D अवतार आणि होलोग्राफिक कंटेंन्टमुळे व्हर्च्युअल स्पेसला आणखी इंटरेक्टिव्ह बनवण्याचा आहे.
पंतप्रधान मोदींनी IMC 2022 दरम्यान सर्व पवेलियनमध्ये 5G तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा नवीन डिव्हाइसेसची माहिती घेतली आणि काहींचा अनुभवही घेतला. यामध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते 'Jio Glass'ने. पंतप्रधान मोदींना देखील Jio Glass घालून त्याबद्दलची माहिती आणि अनुभव घेण्याचा मोह आवरला नाही.
Reliance कंपनीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting 2022) ‘Jio Glass’ करण्यात आला. व्हर्चू्अल स्पेसला आणखी चांगल्या क्वालिटीचं बनवण्यासाठी याचा याचा वापर केला जाणार आहे. यामध्ये 3D अवतार, होलोग्राफिक कंटेंट आणि नॉर्मल व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग देखील केली जाऊ शकते. 'जिओ ग्लास'चं वजन 75 ग्राम असून तो पर्सनलाईज्ड ऑडिओसह येतो. कंपनीनुसार जिओ ग्लासमध्ये 25 अॅप्सचं सपोर्ट आहे. याशिवाय, जिओ ग्लासचा वापर ई-लर्निंग आणि शैक्षणिक वापरासाठी केला जाऊ शकतो.
पंतप्रधान मोदींनी देशभरात 5G सेवा सुरू केली . 5G टेलिकॉम सेवेचा उद्देश यूजर्संना अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणं हा आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या शहरांमध्ये दिवाळी पोहोचणार असल्याचे बोललं जातंय. Jio ने 5G फायद्यांबद्दल सांगितल आहे की, ही सेवा भारतात परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असेल. ही 5G सेवा उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी मदत करेल. याशिवाय या सेवेमुळे भारतात अधिकाधिक रोजगारनिर्मित होण्यास हातभार लागणार आहे.