नवी दिल्ली : Sharad Pawar and Ghulam Nabi Azad Meet : देशाच्या राजकारणातील महत्वाची घडामोड. काँग्रेसमधील नाराज नेते गुलामनबी आझाद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Ghulam Nabi Azad Meets Sharad Pawar In Delhi)
काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी करणाऱ्या 'G-23' या नेत्यांच्या गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे महत्व वाढले आहे. गुलामनबी आझाद यांनी शरद पवार यांची काल रात्री भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली. दिल्लीतील पवार यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील पराभवानंतर जी 23 गटाने नेतृत्वावर व्यक्त तीव्र नाराजी केली होती. नाराजीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आझाद यांची भेट घेतली होती.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यूपीएचे अध्यक्षपद पवार यांना मिळावे, असा प्रस्ताव मंजूर केला होता. तर दुसरीकडे बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बिगर काँग्रेस-बिगर भाजप पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भाजपविरोधात एकवटण्यासाठी लिहिलं पत्र लिहिले होते. यापार्श्वभूमीवर पवार आणि आझाद यांची भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, ही नियमित भेट असल्याची पवार यांनी माहिती दिली.