नवी दिल्ली: दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंका गांधी यांची लावण्यात आलेली पोस्टर्स भाजपने उतरवल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्सवर प्रियंका गांधी यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही दिसत आहेत. मात्र, ही पोस्टर्स भाजपकडून परस्पर उतरवण्यात आली. यावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार गलिच्छ राजकारण खेळत असून काल रात्री त्यांनी परस्पर पोस्टर्स उतरवून टाकल्याचा आरोप काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी केला. यानंतर भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या कृत्याचे समर्थन केले. काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर दोन गुन्हेगारांची छायाचित्र होती. एक म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राहुल गांधी आणि दुसरे म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नुकतेच 'ईडी'च्या चौकशीला सामोरे गेलेले रॉबर्ट वढेरा. सांबित पात्रा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या संजय सिंग यांनी भाजपवर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांची पत्नी असूनही तिच्यासोबत त्यांचे पोस्टर्स लागत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. रॉबर्ट वढेरा हे प्रियंका गांधी यांचे पती आहेत. भाजपकडून अनेक प्रकरणांमध्ये नाहक त्यांचे नाव गोवण्यात आले आहे. मात्र, त्याचा एकही पुरावा अजून भाजपला सादर करता आला नाही. आज रॉबर्ट वढेरा यांना ज्याप्रकारे चौकशीला सामोरे जावे लागत आहे, उद्या नरेंद्र मोदी यांच्यावरही तशीच वेळ येईल, असे संजय सिंग यांनी सांगितले.
Delhi: Posters of Robert Vadra along with Priyanka Gandhi Vadra&Rahul Gandhi that were put up yesterday outside AICC headquarters, have been removed today. Jagdish Sharma,Congress says,"Modi govt is doing dirty politics, last night the posters were put up here now being removed." pic.twitter.com/hTAIVdSM3C
— ANI (@ANI) February 6, 2019
Sambit Patra,BJP:Posters of 2 criminals have been put in front of Congress office.Both of them are out on bail; Criminal no.1 Rahul Gandhi in connection with National Herald case&criminal no.2 Robert Vadra who has to appear before ED today in connection with money laundering case pic.twitter.com/FiyJxQaDWw
— ANI (@ANI) February 6, 2019
Sanjay Singh, Congress: Ye durbhagya hai Modi ji ka ki unki patni hai aur unke saath vo poster nahi lagate. Robert Vadra Priyanka ke pati hain, bhagwan kare unka sambandh rahe.Unka naam jo tamaam cheezo mein ghaseeta ja raha hai aaj tak BJP ke paas ek baat bhi pramaan ki nahi hui pic.twitter.com/mWk0h6rg67
— ANI (@ANI) February 6, 2019