नवी दिल्ली : कोरोना व्हायरससोबत दोन हात करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. दिवसेंदिवस मदत करणाऱ्यांच्या आकड्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. आता कोरोनाशा लढण्यासाठी भारतीय रेल्वेकडून कोट्यवधींचा मदत निधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेकडून प्रधानमंत्री सहायता निधीला १५१ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. अशी घोषणा खुद्द रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचे आवाहन केले होते.
PM @NarendraModi जी के आह्वान पर मैं और मेरे साथी रेल राज्य मंत्री सुरेश अंगड़ी जी एक महीने के, तथा रेलवे के 13 लाख, व PSU के साथी एक दिन के वेतन से, PM CARES में ₹151 करोड़ की राशि का सहयोग देंगे।
साथियों के सहयोग से अभिभूत हूं, मेरी प्रार्थना है कि देश स्वस्थ व सुरक्षित हो।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 29, 2020
त्यामुळे आता देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून मतदीचे हात पुढे येत आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मी आणि माझे सहकर्मचारी राज्य मंत्री सुरेश अंगडी आम्हा दोघांचे एका महिन्याचे वेतन त्याचप्रमाणे १३ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन अशाप्रकारे आम्ही प्रधानामंत्री सहायता निधीला १५१ कोटी रूपयांची मदत करत आहोत.' असं ट्विट रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ९७९ रुग्ण झाले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९६ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि ठाणेमध्ये १०७, पुण्यात ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १, बुलढाणा १ अशी रुग्णांची संख्या आहे. यापैकी मुंबईतले १४, पुण्याचे १५, नागपूरचा १, औरंगाबादचा १ आणि यवतमाळचे ३ अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज दिला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.