नवी दिल्ली : देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून सण साजरे करता येत नव्हते. पण यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने पुन्हा एकदा सण मोठ्या उत्साहात साजरे होण्यास सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी लहान मुलींसोबत रक्षाबंधन साजरा केला. पीएम मोदींच्या हातावर राखी बांधणाऱ्या मुली पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर कर्मचाऱ्यांच्या मुली असल्याने हे त्यांच्यासाठी विशेष रक्षाबंधन होते.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकार्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये पंतप्रधान पीएमओ सफाई कर्मचारी, सहाय्यक, माळी आणि ड्रायव्हर यांच्या मुलींकडून राख्या बांधून घेत असताना दिसत आहेत. त्याआधी पंतप्रधानांनी ट्विट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
एक धागा विश्वास का, धर्म की रक्षा का, देश की रक्षा का...
प्रधानमंत्री श्री @narendramodi ने बच्चियों से राखी बंधवा मनाया रक्षाबंधन का त्योहार। pic.twitter.com/b3rJQciucW
— BJP (@BJP4India) August 11, 2022
भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा सण देशभरात सावन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.