नवी दिल्ली : चेकच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छित असाल काळजी घ्यायला हवी. कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँकेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल या महिन्याच्या सुरूवातील म्हणजेच 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहेत. जर तुम्ही चेक पेमेंट करू इच्छिता तर या नियमांबाबत माहिती असायलाच हवी.
नवीन बँकिंग नियमांचे चेक पेमेंटवर परिणाम
RBI ने 24 तास आता बल्क क्लिअरिंग सुविधा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम तुमच्या चेक पेमेंटवर होणार आहे. सध्या चेक पेमेंट होण्याला 2 दिवसांचा वेळ लागतो.परंततु या नियमांनंतर 2 दिवसांचा वेळ लागणार नाही. म्हणजेच. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवावे लागतील. जर तुम्ही हा विचार करून चेक देत असाल की उद्या आपल्या खात्यात्या पैसे टाकू आणि आज चेक क्लिअरिंगला देऊ तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. चेक बॉउंस होऊ शकतो. म्हणून चेक देण्याआधी तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम चेक करा मग चेक क्लिअरिंगला द्या.
सुट्टीच्या दिवशीही होणार चेक क्लिअरिंग
रिझर्व बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउसला (NACH) आता 24 तास सातही दिवस चालु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नियम सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांसाठी लागू असणार आहे. या नियमांमुळे सुट्टीच्या दिवशीही तुमचा चेक क्लिअर होणार आहे. त्यामुळे शनिवारी / रविवारी जारी केलेले चेक देखील क्लिअर होतील.
NACH ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संचालित करते. जे अनेक प्रकारचे क्रेडिट ट्रान्सफर सारखे डिविडंड, इंटरेस्ट, सॅलरी आणि पेंशन सुविधा देतात. याशिवाय इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, गॅस, टेलिफोन, पाणी, EMI, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि इंशुरन्स प्रीमियमचे पेमेंटचीदेखील सुविधा देतात. या सर्व सुविधांसाठी साठी तुम्हाला सोमवारीची वाट पाहण्याची गरज नाही. शनिवार किंवा रविवारी देखील तुम्ही पेमेंट करू शकता.