Jobs alert | रिझर्व बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; पदवीधरांसाठी 950 जागांसाठी भरती

RBI Recruitment 2022 / job alert / Banking Jobs / reqruitment:  भारतीय रिझर्व बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आरबीआयने असिस्टंट पदाच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे

Updated: Feb 17, 2022, 09:56 AM IST
Jobs alert | रिझर्व बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; पदवीधरांसाठी 950 जागांसाठी भरती title=

मुंबई : RBI Recruitment 2022:  भारतीय रिझर्व बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आरबीआयने असिस्टंट पदाच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना 17 फेब्रुवारी 2022 पासून आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर अप्लाय करता येईल.

किती पदांसाठी भरती.

भारतीय रिझर्व बँकेच्या नोटिफिकेशननुसार, एकूण 950 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी निवड केलेल्या उमेदवारांची देशातील वेगवेगळ्या भागात पोस्टिंग करण्यात येणार आहे.

RBI Recruitment 2022 : महत्वपूर्ण तारखा

आरबीआयमध्ये असिस्टंट पदांसाठी 17 फेब्रुवारी 2022 पासून अर्ज दाखल करू शकता. उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी 26 आणि 27 मार्चला परीक्षा होणार आहे. 

वयोमर्यादा

रिझर्व बँकेत असिस्टंट पदांवर अप्लाय करण्यासाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असायला हवे.

कसे करणार अप्लाय

आरबीआयच्या असिस्टंट पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांनी  rbi.org.in वर भेट द्यावी. उमेदवारांनी 8 मार्चच्या आधी या पदांसाठी अर्ज करावा.

अर्जाचे शुल्क

आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार Gen/EWS/OBC  उमेदवारांसाठी  450 रुपये शुल्क तर  SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

पात्रता

रिझर्व बँकेत असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.