RBI चा मोठा निर्णय! 22 जुलैपासून बँकाना Mastercard जारी करण्यास मनाई; सध्याच्या कार्डधारकांबाबतही सूचना

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मोठी सूचना केली आहे. आरबीआयतर्फे नवीन मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास सक्त मनाई केली आहे.

Updated: Jul 15, 2021, 08:02 AM IST
RBI चा मोठा निर्णय! 22 जुलैपासून बँकाना Mastercard जारी करण्यास मनाई; सध्याच्या कार्डधारकांबाबतही सूचना title=

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना मोठी सूचना केली आहे. आरबीआयतर्फे नवीन मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Mastercard Debit And Credit Card) जारी करण्यास सक्त मनाई केली आहे. यानंतर बँकांकडून जुन्या मास्टरकार्डचे डेबिट आणि क्रेडिट, प्रीप्रेड कार्ड लोकांना देण्यात येणार नाही. या नियमांचे पालन सर्व बँकांना 22 जुलैपासून करावे लागणार आहे.(RBI New Rules)

आरबीआयचे म्हणणे आहे की, कोरोना काळात अनेक अवैध प्रकरणं समोर आली आहेत.मास्टरकार्डतर्फे डेटा स्टोरेज नियमांचे पालन होत नाहीये. यासाठी मास्टरकार्डवर स्थगिती असणार आहे. तर सध्याच्या मास्टरकार्ड धारक ग्राहकांची सेवा सुरळीत सुरू राहणार आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, मास्टरकार्डच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. कंपनीला पुरेसा वेळ आणि संधी  दिल्यानंतरही पेमेंटच्या  (payment system statistics) आकड्यांचे नीट स्टोरेज तसेच गाईडलाईन्सचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. 

पेमेंट सिस्टिम स्टॅटिस्टिक्सच्या मेंटनंन्सबाबत आरबीआयने 6 एप्रिल 2018 रोजी सर्कुलर जारी केले होते. त्याअंतर्गत संबधीत सेवा प्रदात्याला सूचना करण्यात आल्या होत्या की, 6 महिन्याच्या आत भारतीयांच्या पेमेंट सिस्टिमशीसंबधीत सर्व आकडे फक्त देशातच ठेवण्याची व्यवस्था करावी. ही व्यवस्था करण्यात मास्टरकार्ड अपयशी ठरले आहे.