Recruitment 2021 | पदवीधरांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अप्लाय कसे करायचे वाचा

भारतीय आदिवासी मंत्रालयात अनेक पदांवर भरती होणार 

Updated: Apr 1, 2021, 09:54 AM IST
Recruitment 2021 | पदवीधरांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अप्लाय कसे करायचे वाचा title=

 Tribal Ministry Recruitment 2021: भारतीय आदिवासी मंत्रालयात अनेक पदांवर भरती होणार आहे. या सरकारी नोकरीत चांगला पगार असणार आहे. त्यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
आदिवासी मंत्रालयाने देशातील १७ राज्यांमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक पदांवर भरती होणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://tribal.nic.in/Home.aspx) भेट द्यावी.

 अर्ज भरण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
 
 अर्जदारांनी आदिवासी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर तेथील Whats New या लिंकवर क्लिक करावे. या पेजवर असलेले नोटिफिकेशन सविस्तर वाचावे. 
 
 देशभरातील १७ राज्यांमध्ये एकलव्य निवासी विद्यालयांतील शिक्षकांच्या स्टाफसाठी ३४७९ पदे भरली जाणार आहे.

 या पदांच्या अर्जासाठी महत्वाच्या तारखा

  •   अर्ज करण्याची सुरूवात : १ एप्रिल २०२१
  •  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२१
  •  परिक्षेची  तारीख  - जूनचा पहिला आठवडा

 
 पदसंख्या 

  •  एकूण - ३४७९
  •  मुख्याध्यापक - १७५ 
  •  उपमुख्याध्यापक - ११६
  •  पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक - १२४४
  •  प्रशिक्षित ग्रॅज्युएट शिक्षक - १९४४

 
 संबधित पदांसाठी संगणक आधारित चाचणीच्या (CBT) आधारे परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.