नवी दिल्ली : गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय.
आपल्या अनोख्या 'डूडल' संकल्पनेतून गूगलनं भारताचा प्रजासत्ताक दिवस साजरा केलाय. भौगोलिक आकृत्यांचा वापर करत गूगलनं हे डूडल बनवलंय.
यामध्ये विविध राज्यांचा जीवंत रंग आणि त्यांची सांस्कृतिक समृद्धी दर्शवण्यात आलीय. डूडलच्या मुख्य भागात देशाचे शिल्प, संगीत आणि पारंपरिक प्रथांचं प्रतीक दर्शवण्यात आलंय. यामध्ये एक व्यक्ती प्राचीन संगीत वादययंत्रासोबतही दिसतोय.
या डूडलमध्ये चक्रही दिसतंय. चक्र भारताच्या इतिहासातिल एक महत्त्वपूर्ण प्रतिक आहे. तसंच या डूडलमध्ये आसामच्या बिहू नृत्याचीही झलक दिसतेय. यामध्ये हत्तीही दिसतोय. राजेशाही हत्ती हे आनंदाचं प्रतिक मानलं जातं.
इतकंच नाही तर या डूडलमध्ये मुघल वास्तुकलेचा एक नमुनाही सादर करण्यात आलाय. समस्त मुघल वास्तुकलांचं स्मरण या माध्यमातून करण्यात आलंय.
गूगलनं या डूडलच्या माध्यमातून भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा केलाय. याच दिवशी १९५० साली भारत सरकारनं अधिनियम (१९३५) हटवत भारताचं संविधान लागू केलं होतं. एका स्वतंत्र गणराज्य स्थापन होणं आणि देशात कायद्याचं राज्य स्थापन करण्यासाठी भारताचं संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेद्वारे मान्य केलं गेलं... आणि २६ जानेवारी १९५० रोजी एका लोकशाही सरकार प्रणालीद्वारे लागू करण्यात आलं.
२६ जानेवारी या दिवसाची निवड यासाठी करण्यात आली कारण १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं (आयएनसी) भारताला पूर्ण स्वराज्य घोषित केलं होतं. त्यामुळेच यादिवशी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा केला जातो.
भारतानं जाहीर केलेल्या तीन 'राष्ट्रीय दिवस' एक दिवस प्रजासत्ताक दिनाचा आहे... तर स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती या आणखी दोन राष्ट्रीय दिवस...
भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होती. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. पहिला प्रजासत्ताक दिन साजर करत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इरविन स्टेडियममध्ये भारतीय तिरंगा फडकावला होता.
साल १९५० मध्येच प्रजासत्ताक दिनाला भारतात पाहुण्यांना बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली होती. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.