Sanjay Raut On BJP : भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का, असा संशय उपस्थित होतोय, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे. देशाची जनता ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरतेय ते पाहता यांना खरंच मतदान झाले होते का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
अदानी हा केवळ चेहरा, पैसा मोदी यांचा आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यात तथ्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी मुख्यमंत्री असतानाच अदानीचा उदय झाला असं ते म्हणाले. दरम्यान, सध्या प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळतेय, असं म्हणण राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या डीलिट पदवीची खिल्ली उडवली आहे.
Sanjay Raut | Narendra Modi उद्योगपती Gautam Adani यांना का वाचवतात? संजय राऊत यांचा सवाल@rautsanjay61
.
.
.#SanjayRaut #NarendraModi #GautamAdani #VeerSavarkar pic.twitter.com/BMfKBie835— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 29, 2023
दरम्यान, संजय राऊत यांनी आज केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. “केवढी अजब बाब आहे. गुलामीची जेव्हा सवय होते, तेव्हा प्रत्येकजण आपली खरी ताकद विसरतो”, असे लिहित एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक घोडा एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधून ठेवल्याचे दिसत आहे. भारत माता की जय!
भारत माता की जय! pic.twitter.com/r6E4kCt03S
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
सावरकर प्रकरणावरुन नाशिकमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळला आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहरात संजय राऊत यांना डिवचणारे पोस्टर्स लावले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाची गद्दारी करणारे बघा हेच ते गद्दार या आशयाचे पोस्टर्स शहरभर लावण्यात आले आहेत. मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लगेच हटवले. तेव्हा शिवसेना आणि ठाकरे गटात वाद चिघळण्याची चिन्ह आहेत.