Saving Scheme News : तुम्हाला मुलीच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना एक बेस्ट पर्याय आहे. (Saving Scheme News In Marathi) केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांना मदत पुरवते. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी शासनाकडून योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही (Sukanya Samriddhi Yojana ) समावेश आहे. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल.
मुलींसाठी एक चांगली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेवरील व्याजदर जानेवारी-मार्च 2023 तिमाहीसाठी अपरिवर्तित ठेवण्यात आला आहे. तथापि, ही योजना सध्या 7.6 टक्के दराने परतावा देत आहे. तसेच ही योजना पूर्णपणे जोखीममुक्त आणि सरकारी आहे. ही योजना मुलीच्या पालकांना तिचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते.
या योजनेंतर्गत, सुकन्या समृद्धी योजना खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पालक उघडू शकतात. मुलगी 18 वर्षांची झाली की ती खातेदार होईल. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. परंतु जुळ्या, तिहेरी मुलींच्या जन्माच्या बाबतीत, दोनपेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. तसेच इतर बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे खाते हस्तांतरित करु शकता. या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षे आणि मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहे. या खात्यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
खातेधारकांना ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ठेवींवर 7.6 टक्के व्याज मिळेल. कमावलेले व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते आणि आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे. याच कलमांतर्गत ठेव रकमेवरही सूट देण्यात आली आहे.