नवी दिल्ली: केरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. पंतप्रधानांपासून ते थेट मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनापर्यंत असे सर्वजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना मदत करत आहेत. अशात स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआयनेही या पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. एसबीआयने पूरग्रस्तांना मदत म्हणून तब्बल दोन कोटी रूपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एसबीआयने पूरग्रस्तांसाठी इतरही अनेक सुविधा देऊ केल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत. राज्यातली लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. प्रचंड प्रमानात वित्तहानीही झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.