मुंबई : SBI New Rule: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ग्राहक फक्त SBI च्या YONO अॅपद्वारे लॉगिन करू शकतात की, ज्याचा मोबाइल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.
आजकाल ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. यामुळे, योनो अॅपमध्ये हे नवीन अपग्रेड समाविष्ट केले गेले आहे. यामुळे ग्राहकांना केवळ सुरक्षित बँकिंगचा अनुभव मिळणार नाही तर ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाहीत.
Bank Securely with YONO SBI!
YONO SBI is leveling up its security features. The new upgrade will allow access to YONO SBI only from the phone which has the mobile number registered with the bank.
#YONOSBI #YONO #Banking #Upgrade pic.twitter.com/WtV86zQVfF— State Bank of India (@TheOfficialSBI) July 25, 2021
बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे की, नवीन नोंदणीसाठी ग्राहकांनी त्याच फोनचा वापर करावा. ज्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत आहे. म्हणजेच, आता SBI YONO खातेधारकांना इतर कोणत्याही नंबरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना कोणताही व्यवहार करता येणार नाही.
आता या नवीन नियमानुसार, आपण कोणत्याही फोनद्वारे अॅपमध्ये लॉग इन करू शकत नाही, तर पूर्वीचे ग्राहक कोणत्याही फोनवरून लॉग इन करू शकत होते. आता तुम्ही ज्या मोबाईलमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर राहील त्याच मोबाइलवरून योनोची सुविधा वापरू शकता. बँकेने म्हटले आहे की याद्वारे ती ग्राहकांसाठी सुरक्षा सुविधा वाढवत आहे.