नवी दिल्ली : तुमचं बँकेत अकाऊंट आहे आणि अकाऊंटमध्ये शिल्लक रक्कम कमी झाल्याने पेनल्टी भरावी लागत आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्हालाही झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करायचं आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु केल्यास तुम्हाला बँक खात्यात कुठल्याही प्रकारची रक्कम शिल्लक ठेवावी लागणार नाहीये.
एसबीआयने योनो अॅप (YONO APP) च्या माध्यमातून सेव्हिंग अकाऊंट (बचत खातं) सुरु करण्याची ऑफर दिली आहे.
एसबीआयने योनो अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना नवं झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याची सुविधा दिली आहे. या अकाऊंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सवर पेनल्टी द्यावी लागणार नाहीये. या ऑफरसंदर्भात एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक योनो अॅप (यू नीड ओनली वन) च्या माध्यमातून नवं अकाऊंट सुरु करतील त्यांना बँकेकडून झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याची सुविधा दिली जाणार आहे.
जर तुम्ही या सुविधेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर ३१ ऑगस्ट २०१८ पूर्वी तुम्हाला अकाऊंट सुरु करावं लागणार आहे. या तारखेनंतर अकाऊंट सुरु करणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार नाहीये. यासोबतच हे अकाऊंट सुरु करण्यासाठी बँकेकडून काही नियम आणि अटीही ठेवण्यात आल्या आहेत. पाहूयात काय आहेत या अटी आणि नियम...