Secured Credit Card म्हणजे काय रे भाऊ? नेहमीच्या सीसीपेक्षा इथं मिळतात जास्त फायदे

Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? किंवा भविष्यात हे कार्ड वापरण्याचा विचार आहे का? त्याआधी Secured Credit Card चा अर्थ समजून घ्या. त्याचे फायदेही जाणून घ्या.   

Updated: May 9, 2023, 02:38 PM IST
Secured Credit Card म्हणजे काय रे भाऊ? नेहमीच्या सीसीपेक्षा इथं मिळतात जास्त फायदे  title=
Secured Credit Card use offers and benefits

Credit Card : काहींजणांसमोर क्रेडिट कार्डचा उल्लेख जरी केला तरीही त्यांना धडकी भरते. एकाएकी क्रेडिट कार्ड, त्यामुळं केलेली खरेदी, त्यानंतरचं येणारं भलंमोठं बिल हे सर्वकाही आठवतं. पण, काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. कारण, याच क्रेडिट कार्डमुळं त्यांना अनेक अशा गोष्टी घेणं शक्य होतं, जिथं अधिकाधिक खर्च अपेक्षित असतात. क्रेडिट कार्डचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास या मंडळींना कर्ज घेतेवेळीसुद्धा अडचणींना सामोरं जावं लागत नाही. थोडक्यात मागील काही वर्षांपासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांचा आकडा सातत्यानं वाढतानाच दिसत आहे. 

तुम्हाला माहितीये का, क्रेडिट कार्डमध्येही रेग्‍युलर क्रेडिट कार्ड आणि सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड असे काही प्रकार असतात. ज्यांचा Credit Score खराब असतो किंवा ज्यांना क्रेडिट स्कोअरची History नसते, काही कारणास्तव त्यांना क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही अशआ मंडळींसाठी Secured Credit Card हा एक उत्तम पर्याय आहे. या कार्डसाठी Apply करण्याचा विचार तुम्हीही करताय का? पण, त्याआधी त्यातला फरक आणि त्यांचे अर्थही जाणून घ्या.  

Regular Credit Cards 

सर्वसामान्यपणे अनेकजण वापरत असलेलं क्रेडिट कार्ड हे अनसिक्योर्ड क्रेडिट कार्ड असतं. जिथं एफडी किंवा कोलॅटरलची गरज नसते. चांगली मिळकत, चांगला क्रेडिट स्कोअर आणि चांगली रिपेमेंच हिस्ट्री असणाऱ्यांना हे कार्ड अगदी सहजपणे मिळून जातं. 

Secured Credit Card 

एफडी किंवा कोलॅटरलच्या बदल्यात हे कार्ड मिळतं. बहुतांश सिक्योर्ड कार्ड्ची मर्यादा एफडीच्या 85 टक्क्यांपर्यंत असते. तुमची एफडी जोपर्यंत बँकेत आहे, तोपर्यंत तुम्ही हे कार्ड वापरू शकता. 

Secured Credit Card चे आणखी काय फायदे? 

- FD वर क्रेडिट कार्ड घेतल्यामुळं कार्ड धारकाला एफडी खात्यावर व्याज मिळण्यासोबतच अधिकच्या खर्चासाठी क्रेडिट लिमीट वाढवण्याचा पर्यायही मिळतो. 

- कोलॅटरच्या बदल्यात हे कार्ड मिळत असल्यामुळं त्यासाठी approval सहजपणे मिळतं. 

हेसुद्धा वाचा : 'या' आहेत Top 5 110cc Scooters, बजेटसह मायलेजही कमाल 

 

- नियमित क्रेडिट कार्डच्या तुलनेत एफडीवर देण्यात येत असल्यामुळं या कार्डचं व्याज रकमी असतं. 

- वेळच्यावेळी बिल भरण्याच्या सवयीमुळं तुम्ही या कार्डचाही क्रेडिट स्कोअर चांगला ठेवू शकता. ज्याचा वापर तुम्हाला भविष्यासाठी होईल.