Shraddha Murder Case Aftab Update: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाच रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांकडून श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याची कसून चौकशी सुरू असताना दुसरीकडे श्रद्धाचे वडील विकास वालकर (Vikas Walker) यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्याचदरम्यान तिहार तुरुंगात बंद असलेल्या श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन (Aftab Poonawala) याला आपल्या आई-वडिलांना भेटणार का? अशी विचारणा पोलिसांकडून करण्यात आली. त्यावर आफताबने भेटण्यास नकार दिला आहे.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याची चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणी (Polygraph test) करण्यात आली. पॉलीग्राफ चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची नार्को चाचणीही केली जाणार असून, त्याला न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. याचदरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, तिहार तुरुंगातील (Tihar Jail) अधिकाऱ्यांनी आफताबला स्वत: च्या आई-वडील, भाऊ आणि मित्राला भेटायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर त्याने नकार दिला असून सध्या तो कोणाल भेटू इच्छित नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. एवढेच नाही तर त्याचे आई-वडील, लहान भाऊ आणि मित्रानेही त्याला तुरुंगात भेटण्यास अजिबात रस दाखवला नाही. आतापर्यंत चौघांपैकी कोणीही आफताबला भेटण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे बुकिंग केलेले नाही. 14 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर 26 नोव्हेंबरला आफताबला तिहार तुरुंगात आणण्यात आले. जिथे ते तिहारच्या तुरुंग क्रमांक-4 मध्ये कैदी क्रमांक-11529 च्या नवीन ओळखीसह बंद आहे.
तुरुंगात आल्यानंतर या 11 दिवसांत आफताबने (Aftab Poonawala) आपल्या आई-वडिलांना किंवा भावाच्या मित्राला एकदाही भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. कारागृह प्रशासनानेही त्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यास सांगितले होते. मात्र त्याने त्यात रस दाखवला नाही. आतापर्यंत, त्याने आपल्या कुटुंबीयांना किंवा त्याच्या एकमेव मित्राला कारागृहातून कायदेशीररित्या बाहेर काढण्यासाठी दूरध्वनी करण्यातही रस दाखवला नाही. अजून कोणाला फोन केला नाही.
वाचा: टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे इथे चेक करा
आफताबला श्रद्धाच्या हत्येचा कोणताही पश्चाताप नाही!
इंग्रजी कादंबऱ्या आणि इतर पुस्तके वाचण्याची त्याची मागणी पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या तो तेच इंग्रजी पुस्तक वाचत आहे जे त्याला दिले होते. तुरुंगात असताना त्याच्या देहबोलीवरून आणि शब्दांवरून त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे दिसत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आफताब एकदम सामान्य पद्धतीने जगत आहे. त्याच्या वागण्यातून त्याने इतका निर्घृण खून केला असेल असे त्याला वाटतच नाही.
आफताबची 2 टप्प्यांत 10 दिवस कसून चौकशी
श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे शिर कुठे टाकून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात एक तलावही रिकामा करण्यात आला. हरतऱ्हेने आफताबची चौकशी केली जात आहे. परंतु, पोलिसांना ठोस असे काहीच मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये 10 दिवस कसून चौकशी केली आहे.