मुंबई : आता एक महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. आजपासून देशात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी लावण्यात आली आहे. त्याचा थेट तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. तुम्ही रोजच्या वापरात जर सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू वापरत असाल तर आजपासून त्या बंद करा.
सिंगल युज प्लास्टिक वापरणारे किंवा विक्रेते दोघांवरही कठोर कारवाई आजपासून करण्यात येणार आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या कोणत्या 19 गोष्टींवर बंदी लावण्यात आली जाणून घेऊया. त्यामुळे या वस्तू जर तुम्ही अजूनही वापरत असाल तर बंद करा.
प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथिन (75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीसह)
प्लास्टिकच्या स्टिक असणारे कानातले
फुग्यांसाठी प्लास्टिकची काठी
प्लास्टिकचे ध्वज
कँडी स्टिक, आयस्क्रीम स्टिक
थर्माकोल
प्लास्टिक प्लेट
प्लास्टिक कप
प्लास्टिकचे ग्लास
काटे
चमचा
प्लास्टिक सुरी
स्ट्रॉ
ट्रे
मिठाईच्या डब्यांना पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी चिकटपट्टी
इन्विटेशन कार्ड
सिगरेटची पाकिटाचे कव्हर
100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक असलेल्या कोणत्याच वस्तू किंवा पिशव्या किंवा पीव्हीसीवर बंदी लावण्यात आली आहे.
सिंगल युज प्लास्टिक जर वापलं तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. ग्राहकांना पहिला दंड 500 ते 1000 रुपये तर दुसऱ्यावेळी 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर विक्रेत्यांना 5000 रुपयांचा दंड किंवा दुकान सील किंवा शिक्षा होऊ शकते.