दिल्ली: दिल्ली येथील खैरा गावातील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेवर शुक्रवारी दरोडा पडला. यावेळी दरोडेखोराने केलेल्या गोळीबारात बँकेच्या कॅशियरचा मृत्यू झाला. यानंतर चोरट्यांनी बँकेतील दोन लाखांची रोकड घेऊन पळ काढला. बँकेच्या बाहेर आल्यानंतरही दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्येही पाच जण जखमी झाले आहेत.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये दरोडेखोऱ बँकेत शिरताना दिसत आहेत. बँकेत शिरल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सुरक्षारक्षकाची बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून सर्वांना एका कोपऱ्यात बसवले. मात्र, बँकेचे कॅशियर असलेल्या संतोष कुमार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. संतोष कुमार हे भारतीय वायूदलातील निवृत्त कर्मचारी आहेत. प्रतिकार केल्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्या छातीत गोळी मारली.
यानंतर दरोडेखोर रोकड घेऊन फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस बँकेत पोहोचले तेव्हा संतोष कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दरोडेखोरांचा तपास सुरु केला आहे. दरोडेखोरांनी बँकेतील पैशासोबत सुरक्षारक्षकाची बंदुकही चोरून नेली आहे.
#WATCH: CCTV footage of a corporation bank being robbed in Delhi's Khaira yesterday by armed assailants. Cashier was shot dead. Investigation underway. pic.twitter.com/4XSz1JX8AF
— ANI (@ANI) October 13, 2018