Amrith Noni : अमृत नोनी ऑर्थो प्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी

अमृत नोनीने आयुर्वेदिक औषधांसाठी गाठलेला हा टप्पा संधीवाताने ग्रस्त असलेल्यांच्या वेदना व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Updated: Feb 3, 2025, 01:24 PM IST
Amrith Noni : अमृत नोनी ऑर्थो प्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी title=

मुंबई: अमृत नोनीने आपले प्रमुख उत्पादन असलेल्या अमृत नोनी ऑर्थो प्लससाठी मानवी क्लिनिकल चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. औषध क्लिनिकल चाचांसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अत्यंत काटेकोर मार्गदर्शक तत्त्वानुसार नालंदा क्लिनसर्व्हच्या सहकार्याने आयोजित या चाचणीतून ग्राहकांना उच्च-गुणवत्तेसह प्रभावी उपाय उपाय प्रदान करण्याच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. अमृत नोनीने आयुर्वेदिक औषधांसाठी गाठलेला हा टप्पा संधीवाताने ग्रस्त असलेल्यांच्या वेदना व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या यशस्वी क्लिनिकल चाचणीनंतर बेंगळुरू येथील पत्रकार परिषदेला संबोधित करताना, व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. श्रीनिवासमूर्थी म्हणाले, या उत्पादनातून संधिवातासाठी नाविन्यपूर्ण उपचाराच्या निकडीची गरज अधोरेखित झाली आहे. भारताच्या लोकसंख्येतील २१० दशलक्षाहून अधिक अर्थातच 15 टक्के लोकसंख्या संधीवाताने प्रभावित आहे. ज्यामध्ये ऑस्टियोआर्थरायटिस,संधिवात असे १०० हून अधिक प्रकार समाविष्ट आहेत. ही व्याधी कर्करोग, एचआयीव्ही एड्स आणि मधुमेहापेक्षा अधिक सामान्य आहे. तणाव आणि व्यस्त जीवनशैलीतील बदलांमुळे संधिवात तरुणांसाठीदेखील वेदनादायी समस्या बनत आहे. या व्याधीवर पूर्ण उपचार नसला तरी, सुरक्षित आणि अधिक प्रभावी व्यवस्थापनातून वेदना कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो.

गेल्या १५ वर्षांपासून, अमृत नोनी हे उत्पादन आयुविदक औषधांमध्ये विश्वासार्ह नाव बनले आहे. या अद्ययावत क्लिनिकल चाचणीतून दुहेरी अभ्यासाद्वारे, ऑस्टियोआर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस आणि गाउटसारख्या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी अमृत नोनी ऑर्थो प्लसने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आहे.

सकाराक परिणामांसह अद्वितीय सूत्रीकरण

उत्पादनातील प्रगत संशधन आणि विकासावर प्रकाश टाकताना ओमश्री मार्केटिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मंगलम्बिके म्हणाल्या, "अनुभवी, निष्णात आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधकांच्या सहकार्याने विकसत केलेले अमृत नोनी ऑर्थो प्लस, सांधेदुखी व्यवस्थापनासाठी भारतातील सवािधक विक्रीय होणारे उत्पादन म्हणून उदयास आले आहे. देशातील ३० लाखांहून अधिक ग्राहकांना अमृत नोनी ऑर्थो प्लसमधील अद्वितीय आणि प्रभावी गुणधर्मामुळे गुडघेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळाला आहे."

अमृत नोनीने यापूर्वीही अमृत नोनी डी प्लससाठी कठोर निकषावर आधारित वैज्ञानिक संशोधनातून केलेल्या यशस्वी चाचणीतून आपले समर्पण सिद्ध केले आहे. या उत्पादनाने कॅन्सी-केअरसह कर्करोगाच्या पेशींवर वैज्ञानिक, शास्त्रीय अभ्यास पूर्ण केला आहे.  यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आयुर्वदिक तज्ज्ञ डॉ. संदीप बेनाकल आणि डॉ. महंतस्वामी हिरेमठ यांनी या यशस्वी क्लिनिकल चाचणी आणि संशोधनाचे कौतुक केले. पारंपारिक आयुर्वदिक चिकित्सेची अत्याधुनिक वैज्ञानिक प्रमाणीकरणाची सांगड घालून अमृत नोनी आयुर्वेदिक आरोग्यसेवेत नवीन बेंचमार्क स्थापित करत असल्याचे समाधान यातून व्यक्त झाले.

क्लिनिकल चाचणीचे ठळक मुद्दे

नालंदा क्लिनसर्व्ह येथील क्लिनिकल रिसर्च प्रमुख डॉ. के. वेंकटेश्वरालू, यांनी या मानवी क्लिनिकल चाचणीबद्दल सविस्तर माहिती दिली. ऑस्टियोआर्थरायटिस, मेटॉइड आर्थरायटिस आणि गाउट या प्रत्येक आजारासाठी ४० रुग्णांचा या अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता. हा अभ्यास ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला. रुग्णांना सक्रीय आणि प्लेसिबो या गटांमध्ये विभागण्यात आले. दोन महिन्यांच्या अंतराने त्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

असे निघाले प्रमुख निष्कर्ष

१. ऑस्टियोआर्थरायटिस: प्लेसिबो गटाच्या तुलनेत सक्रीय गटात वेदना, गतीशीलता, रक्तातील कॅल्शियम, मॅग्नेशियम पातळी आणि हाडांच्या खनिज घनतेमध्ये लक्षनीय सुधारणा 

२. संधिवात: सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (CRP), रूमेटॉइड फॅक्टर (RA फॅक्टर) आणि ESR मध्ये लक्षणीय घट, सीरम इम्युनोग्लोबुलिन पातळी आणि अँटिन्यूक्लियर अँटीबॉडी (ANA) पातळीत सुधारणा.

३. गाउट: असह्य वेदना आणि जळजळीतून रुग्णांची मुक्ती. वेदना व्यवस्थापनामुळे जीवनमानाची गुणवत्ता सुधारली. शिवाय मूत्रपिंड आणि यकृतासारख्या अवयवांवरील संभाव्य दुष्परिणाम टाळता आले.

पत्रकार परिषदेत बोलताना, ओमश्री मार्केटिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ नारायण आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. संदीप बेनाकल यांनी या यशस्वी संशोधनाचे कौतुक केले. 

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा: +९१ ९९४५३ ५०५०५ / +९१ ९८४५२ ०३९१८

 

Disclaimer (This article is part of IndiaDotCom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)