Maharashtra Kesari Kusti 2025: रविवारी 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोण पटकवणार यांच्याकडे सगळ्यांच्या नजर लागल्या होत्या. साताऱ्याचा महेंद्र गायकवाडचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीच्या गदावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या राडा आणि मारहाणीमुळे जेतेपदाबाबत सर्व जण उत्सुक होते. अखरे अंतिम फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली. परंतु शेवटी या स्पर्धेला गालबोट लागले.
अहिल्यानगर इथल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडने माती विभागातून अंतिम लढतीत दमदार एन्ट्री मारली. तर, पृथ्वीराज हा मॅट विभागातून अंतिम लढतीत धडक मारली. महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये झालेल्या तुल्यबळ लढत कुस्ती चितपट न होता प्लॅईंट ही कुस्ती पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. परंतु शेवटी पैलवान शिवराज राक्षेने पंचांवर दादागिरी केली.
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य झाला नाही. या पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्याने चुकीचा निर्णय दिला म्हणून थेट पंचांना मारहाण केली. त्यामुळे काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदावला. खेळाडूंनी मैदानातच वाद घातला. त्यामुळे पोलिसांना देखील मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी शिवराज राक्षेला मैदानातून बाहेर काढण्यात आलं. यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
शिवराज राक्षेचं निलंबन करण्यात आल आहे. यावर आता शिवराजच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबीय म्हणाले, " आमच्या मुलावर अन्याय झाला असून पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने शिवराजला राग अनावर झाला. त्यामुळे केवळ शिवराजवर कारवाई का? पंचांवरही कारवाई करा" असा सवाल कुटुंबाने उपस्थित केलाय. तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी राक्षे कुटुंबाने केलीये.