Prayagraj Kumbh 1954 Stampede Incident: कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. कुंभमेळ्यादरम्यान नद्यांमध्ये स्नान करतात. धार्मिक मान्यतेनुसार या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप धुऊन मोक्ष प्राप्त होतो. खगोलीय घटनांच्या आधारे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्यात नागा साधू, महामंडलेश्वर, महंत, साधू-संत आणि मठाधिपती सहभागी होतात. कुंभमेळा आध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक संदेश दिले जातात. कुंभमेळ्याचे वर्णन वेद आणि पुराणातही आढळते. महाकुंभ मेळा दर 144 वर्षांनी भरतो. यंदा 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा प्रयागरागमध्ये सुरू झाला आहे. असाच कुंभमेळा 71 वर्षांपूर्वी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये करोडो लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान असे काही घडले, की आजही लोक घाबरतात.
आज 3 फेब्रुवारी रोजी प्रयागराग महाकुंभात शेवटचे अमृत स्नान चालू आहे. यासाठी करोडो भाविक संगमावर पोहोचले आहेत. पण 3 फेब्रुवारी ही तारीख अनेक दुःखद घटनांची साक्षीदार आहे. 71 वर्षांपूर्वी म्हणजे 3 फेब्रुवारी १९५४ रोजी अलाहाबादमध्ये प्रयाग कुंभदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत ५०० लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी लोकांना संगमाकडे खेचणाऱ्या या श्रद्धेच्या पवित्र सणावर घडलेल्या या अप्रिय घटनेने हजारो डोळ्यांत कायमचे अश्रू दिले. या घटनेनंतर कुंभमेळ्याच्या व्यवस्थेत आणि मेळ्याच्या स्वरूपामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले.
हे ही वाचा: ISRO ला मोठा धक्का! 100th Missionमध्ये तांत्रिक बिघाड, अंतराळातच अडकली सॅटलाइट
अलीकडेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सध्या सुरु असलेल्या महाकुंभमेळात सुरू पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घडली. मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली आणि प्रयागराज इथं भयंकर चेंगराचेंगरी होत एकच गोंधळ माजला. चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती, की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल होत यंत्रणांनीही इथं धाव घेतली. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला.