मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्...

Mumbai Crime News Today: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे स्थानकात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 3, 2025, 09:44 AM IST
मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्... title=
Woman raped by Porter in empty train at Bandra railway station mumbai police

Mumbai Crime News Today: वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हरिद्वारहून ५५ वर्षीय महिला तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले होते.  त्यावेळी ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली. त्या वेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले. थोड्या वेळाने तो हमाल आत ट्रेनमध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हमाल तिथून पळून गेला. महीलेच नातेवाईक आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली.

बलात्काराची घटना घडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकाने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे हमालाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस कर्मचारी असतात परंतु या प्लॅटफॉर्मवर कोणीच सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते यावर अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, प्लॅटफॉर्मच्या प्रभारींवर काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

या घटनेने मुंबई शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याआधीही मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळं महिला मुंबईत किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.