Samsung Galaxy S25 Ultra चा पहिला सेल आज, 20 हजारांपर्यंत होणार सेव्हिंग, फिचर्स आणि किंमत पाहाच

Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगने त्यांच्या प्रमिअर स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू करण्यात आली आहे. काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत वाचा   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 3, 2025, 10:42 AM IST
Samsung Galaxy S25 Ultra चा पहिला सेल आज, 20 हजारांपर्यंत होणार सेव्हिंग, फिचर्स आणि किंमत पाहाच  title=
Samsung Galaxy S25 Ultra First Sale Today on 3 feb And get discount

Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगने 22 जानेवारी रोजी भारतासह जगभरात Samsung Galaxy S25 Ultra लाँच केला होता. तर, आज 3 फेब्रुवारीपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनचा हा पहिला सेल असून ग्राहकांना चांगल्या ऑफर्स मिळणार आहेत. 

अॅमेझॉन इंडियावर लिस्टेड डिटेल्सच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रावर बँकेकडूनही चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. HDFC बँकेच्या कार्डचा वापर करुन 8 हजार रुपयांपर्यंतचे इस्टंट कॅशबॅक मिळणार आहे. तसंच, सॅमसंगने Samsung Galaxy S25 Ultra व्यतिरिक्त आणखी दोन हँडसेट लाँच केले आहेत. Samsung Galaxy S25 आणि Samsung Galaxy S25 Plus अशी या हँडसेडची नावे आहेत. 

Samsung Galaxy S25 हा बेस व्हेरियंट आहे. तर, Samsung Galaxy S25 आणि Samsung Galaxy S25 Plus मध्ये डिस्प्लेमध्ये अंतर आहे. 

Samsung Galaxy S25 Ultra तीन व्हेरियंटमध्ये येतो. यात एक 12GB+256 GB स्टोरेज आणि दुसरा 12GB+512 GB आणि तिसरा 12 GB+1 TB स्टोरेज व्हेरियंट आहे. 12 GB+256 GBची किंमत 1,11,999 इतकी आहे. तर, 12GB+512 GB ची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे. 12 GB+1 TB स्टोरेजची किंमत 1,65,999 रुपये इतकी आहे. 

Samsung Galaxy S25 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.9 इंच (1400x3120 pixels) Dynamic Amoled 2X स्क्रीन मिळते. स्क्रीन प्रोटेक्शन Corning Gorilla Armor Protection देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy S25 Ultra प्रोसेसर

Samsung चा हा हँडसेट Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येतो. यात 12 GB Ram आणि 1 TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy S25 Ultra चा कॅमेरा

Samsung Galaxy S25 Ultra मध्ये क्वाड कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सला अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यात तिसरा कॅमेरा 50 मेगापिक्सल टेलीफोटो असून चौथा कॅमेरा 10 मेगापिक्सल असून यात 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.