'त्या पंचाला गोळ्या घालून...' शिवराज राक्षेसाठी डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू!

Maharashtra Kesari: आता शिवराजच्या कृत्याविरोधात आणि त्याच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या दोन्ही बाजुच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2025, 01:19 PM IST
'त्या पंचाला गोळ्या घालून...' शिवराज राक्षेसाठी डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू! title=
महाराष्ट्र केसरी

Maharashtra Kesari: अहिल्यानगरमध्ये झालेल्या 67व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली. अखेरच्या काही क्षणांमध्ये महेंद्र गायकवाडला त्यांने चितपट केलंय. विजयानंतर पृथ्वीराजच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण पराभूत झालेला कुस्तीपटू शिवराजने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत गोंधळ घातला. शिवराजने थेट पंचाची कॉलर पकडत लाथ मारल्याचा प्रकार घडला. यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली आहे. आता शिवराजच्या कृत्याविरोधात आणि त्याच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या दोन्ही बाजुच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होते,असं वादग्रस्त विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केले आहे. आपल्यावर देखील 2009 मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता,तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा आरोप देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी केला आहे. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो,ज्यातून त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो,असं देखील चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट करतपृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही, मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे,अशी परखड मत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते.

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी 

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत पृथ्वीराज मोहोळ मानाच्या गदेचा मानकरी ठरलाय. 

2 पैलवान वर्षासाठी निलंबित 

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात सापडली आहे. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे हरल्यानंतर त्यानं पंचांशी वाद घातला. तर महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकांनी पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे गायकवाडच्या समर्थकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया 

शिवराज राक्षेचं निलंबन करण्यात आल आहे. यावर आता शिवराजच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबीय म्हणाले, " आमच्या मुलावर अन्याय झाला असून पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने शिवराजला राग अनावर झाला. त्यामुळे केवळ शिवराजवर कारवाई का? पंचांवरही कारवाई करा"  असा सवाल कुटुंबाने उपस्थित केलाय. तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी राक्षे कुटुंबाने केलीये.