Smriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत

Smriti Irani on Thinness: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आता आपला 25 वर्षांपुर्वींचा (Smruti Irani Instagram) एक जुना व्हिडीओ इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. राजकारणात येण्यापुर्वी त्या मनोरंजन (Smruti Irani News) क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 5, 2023, 07:05 PM IST
Smriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत title=
फाईल फोटो

Smriti Irani Posted 25 Year Old Photo: बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रेटी हे सोशल मीडियावर चांगलेच (Smriti Irani News) सक्रिय असतात. आपले अनेक जूने फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पोस्ट केला आहे. स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. राजकारणात येण्यापुर्वी त्या एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री होत्या (Smriti Irani Instagram) तेव्हा ते आपले या क्षेत्रातील काही जुने फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. त्याचसोबत आपल्या कामाबद्दल आणि खाजगी आयुष्याबद्दलही त्या आपल्या चाहत्यांना अपडेट करतात. तसाच त्यांनी हाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊवरून स्मृती इराणी यांनी त्यांच्या करिअरमधल्या पहिल्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली त्यांचे चाहते हे कमेंट्स करताना दिसत आहे. काहींना तर या स्मृती इराणी आहेत हेही ओळखता आलेलं नाही. हा व्हिडीओ एका टीव्हीतल्या जाहिरातीतला (Smriti Irani Old Whisper Ad) दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये त्या मासिक पाळीबद्दल बोलताना दिसत आहेत. 'ते पाच दिवस' या तीन शब्दांपासून त्या सुरूवात करतात. त्यानंतर मासिक पाळीबद्दल भाष्य करताना दिसतात. 

हेही वाचा - 'वेड' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अकुंश चौधरीच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची बाजी, पाहा आत्तापर्यंतचं कलेक्शन

स्मृती इराणी यांची पोस्ट 

या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''25 वर्षांपुर्वी, एका मोठ्या कंपनीसाठी मी दिलेली ही पहिली जाहिरात. या जाहिरातीचा विषय काही इतका फॅन्सी नव्हता. अनेकजण याच्याविरूद्ध होते कारण अशी जाहिरात करणं म्हणजे एका ग्लॅमरस मॉडेलला पुढे वाव मिळणाऱ्यातला नव्हता. परंतु मी कॅमऱ्यासमोर जायला उत्सुक होते तेव्हा मी यासाठी हो म्हणाले. या विषयी बोलणं वर्ज का बरं असायला हवं? त्यामुळे तेव्हापासून मी मागे वळून पाहिलं नाही. #throwbackthursday हा हॅशटॅग त्यांनी दिला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्स आले आहे. या कॅप्शनबरोबरच त्यांनी खाली म्हटलं की, ता.क- ''हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहते म्हणाले...

या व्हिडीओखाली अनेकांनी नानाविध कमेंट्स द्यायला सुरूवात केली आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सौंदर्यांचे आणि तारूण्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडीओला अनेकांनी सकारात्मक कमेंट्स दिल्या आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला आहे का? सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल झाला आहे.