जेएनयूच्या एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न

 ही विद्यार्थिनी आपल्या मित्र आणि मैत्रिणींसह १४ ऑगस्टला  दिल्लीतील असोला भागात असलेल्या भारतद्वाज तलावाजवळ फिरायला गेली होती. 

Updated: Aug 18, 2017, 06:28 PM IST
जेएनयूच्या एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न  title=

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयू) एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. दिल्लीतील सूरजकुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. ही विद्यार्थिनी आपल्या मित्र आणि मैत्रिणींसह १४ ऑगस्टला  दिल्लीतील असोला भागात असलेल्या भारतद्वाज तलावाजवळ फिरायला गेली होती. 

तेव्हा तेथील स्थानिक गुंडांनी आपल्याला जातीवाचक शिव्या दिल्या, छेड काढली तसेच बलात्काराचा प्रयत्न केला, असा आरोप या मुलीचा आहे. आणखी या प्रकरणातील गंभीर प्रकार म्हणजे, पोलिसांनी ‘कोणतीही कायदेशीर कारवाई नको’ असं सक्तीनं लिहून घेतल्याचंही या मुलीनं म्हटलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ही तरूणी अत्यंत घाबरून गेली आहे. या सगळ्या प्रकारानंतर चालत येणाऱ्या पीडितेच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आल्यानं हे सगळे गुंड पळून गेले.

ही मुलगी आपल्या मित्रासोबत बाईकवरून चालली होती. तर तिचे काही मित्र मैत्रिणी पायी येत होते. त्याचवेळी रस्त्यावर ८ ते ९ गुंडांनी दोन बाईकवर असलेल्या दोघांना अडवलं, बाईकची तोडफोड केली, आमच्या जवळ असलेली ओळखपत्रं फाडून टाकली आणि मोबाईलही तोडले, त्यानंतर या सगळ्या गुंडांनी आपल्याला खेचून एका शेडमध्ये नेलं. तिथे नेऊन बलात्काराची धमकी दिली.

 पीडित मुलगी आणि तिचे मित्र-मैत्रिणी असोला येथून १४ ऑगस्टला रात्री ८.३० च्या दरम्यान परतत होते, त्यावेळी काही स्थानिक गुंडांनी या सगळ्यांना अडवलं. त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली, एवढंच नाही तुम्ही समाजाला कलंक आहात म्हणत,  असं म्हणत शिव्या देखील दिल्या.