PUBG Case : पबजी केस प्रकरणातील गूढ वाढलं! आरोपी मुलासोबत आणखीण एक व्यक्ती घरी असल्याचा संशय

पब्जी खेळता खेळता त्याने स्वत:च्याच आईच्या डोक्यावरच ताणली खरीखुरी बंदूक, आणि मग...

Updated: Oct 27, 2022, 09:27 PM IST
PUBG Case : पबजी केस प्रकरणातील गूढ वाढलं! आरोपी मुलासोबत आणखीण एक व्यक्ती घरी असल्याचा संशय  title=

लखनऊ : देशातल्या तरूणाईला पब्जी या गेम्सने (PUBG Case) अक्षरश वेड लावले होते.या गेमपायी अनेकांनी आत्महत्या केल्याच्या व एखाद्याची हत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यात आता एका घटनेत पब्जी (PUBG Case) खेळू न दिल्याने एका मुलाने स्वत:च्या आईवर (Mother life Ended) गोळ्या झाडून तिची आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर साधारण दोन दिवस हा मुलगा बहिणीसह आईच्या मृतदेहासोबत राहिला होता. दरम्यान या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच या मुलाची काऊन्सिलिंग कमीटीद्वारे चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर या प्रकरणाचं गुढ आणखीणच वाढले आहे. 

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आईची हत्या केल्याप्रकरणी (Mother life Ended) आरोपी मुलाला ताब्यात घेतले. या दरम्यान मुलाची चौकशी केली असता, त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. हे खुलासे एकूण पोलिसांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. या प्रकरणी आता मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. 

काऊन्सिलिंग कमिटीत धक्कादायक खुलासे 

आरोपी मुलाचं बालसुधार गृहात काउन्सिलिंगही (child correction home counseling) करण्यात आलं होते. तीन तासांच्या या काउन्सिलिंगमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तसेच या काउन्सिलिंगमधून अनेक निष्कर्ष सुद्धा समोर आले आहेत. यातला एक निष्कर्श म्हणजे, आरोपी मुलगा हट्टी आणि महत्वाकांक्षी असला तरी तो संवेदनशील असल्याचं समोर आलं आहे. कारण त्याच्यात आपल्या 10 वर्षीय लहान बहिणीच्या प्रती काळजी दिसून आली. आईला संपवल्यानंतर तिच्यासाठी तो जेवण घेऊन येत होता, तिची काळजी घेत होता. जर तो विकृत मानसिकतेचा असता तर त्याने बहिणीची देखील हत्या करून पळ काढला असता. विशेष म्हणजे बहिण या घटनेची मुळ साक्षिदार होती, मात्र त्याने तिचं सुद्धा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला नाही. 

घरात आणखीण एक व्यक्ती उपस्थित होती? 

बालसुधार गृहातील काउन्सिलिंगमध्ये (child correction home counseling) काही धक्कादायक निष्कर्षही समोर आले आहेत. दरम्यान ही मुल ज्यावर विश्वास ठेवून होती अशी एक वक्ती घटनास्थळावर हत्येवेळी उपस्थित होती,असा संशल काउन्सिलिंग कमिटीला आहे. या व्यक्तीच्या भरवशावरचं ही मुलं तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत राहिली असावीत असा संशय आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करायला सुरुवात केली.  

दोन लहान मुलं मृतदेहासोबत राहतात, ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे, असे कमिटीचं म्हणणं आहे. त्यामुळे या हत्येवेळी घटनास्थळी तिसरी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही आईची हत्या निव्वळ पबजीतून झाली नसावी, असा संशय आहे. 

घटनाक्रम काय?

आरोपीची आई त्याला नेहमीच पब्जी  (PUBG Case) खेळण्यापासून रोखायची. त्यामुळे त्याच्या मनात आई विरूद्ध रागाची भावना उत्पन्न झाली होती. या रागाच्या भरात त्याने एका रात्री वडिलांची लायसन्स बंदूक घेऊन आईच्या डोक्यात गोळी झाडली. विशेष म्हणजे ही संपुर्ण घटना त्याच्या लहान बहिणीच्या डोळ्या देखत घडली. या घटनेनंतर मुलगा आपल्या बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला.तर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती. आरोपी मुलगा सतत आईच्या रूममध्ये येऊन ती मेली आहे की जिवंत आहे का, हे तपासायचा. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर साधारण दोन दिवस ते मृतदेहासोबत होते. या दरम्यान मृत बॉडीचा वास येऊ नये यासाठी तो एअर फ्रेशनर मारायाचा. यानंतर काही दिवसांनी या घटना समोर आली होती. 

दरम्यान आतापर्यंत ही घटना खुप साधीसोपी वाटत होती. मात्र काऊन्सिलिंग नंतर प्रकरणातलं गुढ आणखीणच वाढलं होते. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस घटनास्थळी मुलांसोबत असणाऱ्या त्या तिसऱ्या आणि जबाबदार व्यक्तीचा शोध घेत आहे. हा व्यक्ती कोण आहे? याचा पोलिस कसून तपास करत आहे.